Wednesday, April 30, 2008

मसाला पापड-
साहित्य- राजस्थानी उडीद पापड, १कांदा बारीक चिरलेला, १टोमँटॊ बारीक चिरलेला,थोडीशी
कोथिंबीर बारीक चिरलेली,थोडासा चाट मसाला(ऎवरेस्ट चाट मसाला)
कृति- प्रथम पापड भाजून घेणे त्यानंतर एका प्लेटमध्ये पापडावर थोडा कांदा टोमँटॊ
कोथिंबीर बारीक चिरलेली,ऎवरेस्ट चाट मसाला घेऊन त्या पापडावर हे,(पापडावर कांदा टोमँटॊ चाट मसाला पण पसरावेत.) खाण्यासाठी मसाला पापड तयार झालेला आहे.

Tuesday, April 29, 2008

नारळाचा सार (सोल कढी)

साहित्य- १कप नारळाचे दुध, २वाट्य़ा आंबट ताक ,३-४ हिरवा मिरच्या, कढीपत्ता, १चमचा साखर, १चमचा मीठ, कोथिंबीर.
कॄति- कढईत तूप गरम झाल्यावर जिरे, मिरच्या, कढीपत्ता, घालून फ़ोडणी करुन त्यानंतर नारळाचे दुध घालावे. १उकळी आल्यावर ढवळावे, साखर,मीठ, कोथिंबीर घालणे.
मग पहा बनवुन अन झटपट सर्व्ह करा तर!

Sunday, April 27, 2008

एक सुंदर चहा




एक सुंदर चहा (फ़ुर्र SS के पियो )
सकाळचा चहा कसा तयार करतात याबद्दल विशेष चहाची कॄति मी देत आहे.मी केलेला चहा उत्तमच होतो अन त्या चहा बद्दल स्तुती ऎकायला मिळते. अशा त्या छान चहाची कॄति मी खाली देत आहे. हा चहा आपण एकदा अवश्य करुन पहा. आपला प्रतिसादही कळवा हं...!

साहित्य- (२ जणांसाठी) २ कप दूध ,ताजा डस्ट चहा पावडर,साखर एक चमचा
चहाची कॄति : प्रथम एका स्टिलच्या भांड्यात २ कप दूध घेऊन त्या मध्ये ऊकळी
आल्यावर त्यात दिड साखर चमचा प्रमाणानुसार व गोडी प्रमाणे टाकावा.त्यात ताजा डस्ट चहा पावडर दिड चमचा घालावी. या चहात पाणी मात्र अजिबात घालु नये.
यावेळी त्या ऊकळीला चमचा किंवा गाळणीने थोडे ढवळत जावे. गवती चहाची ताजी पत्ती सोबत त्यात आल छोट्या किसणीने किसुन घालावे (नोकरदार महिलांना हे न जमल्यास या मिश्रणा ऎवजी सूंठी पावडर घातली तरी चालेल)मग तयार व्हा या अन म्हणा फ़ुर्र SS के पियो !

Saturday, April 26, 2008

फ़्रिश फ़्राय

फ़्रिश फ़्राय-
एक फ़्रिश१०तुकडॆ सुरमई धुऊन घेणे त्यानंतर हळद, मीठ, लिंबुचा रस सुरमईवर लावुन १०मि. मुरु दिल्यानंतर वाटण मसाल ओले खोबरे, धणे १चमचा, मिरच्या ३,आले अर्धा इंच, गरम मसाला १चमचा घेऊन त्या सुरमईवर हा वाटण मसाल लावुन ठेवणे. थोडा रवा सुरमईवर लावुन ठेवुनथोडा तेलात फ़्रिश फ़्राय करणे. ही गरमा गरम डिश तयार झाली आहे.

Wednesday, April 23, 2008

गाजराची कोशिंबिर




गाजर ३-४ धुऊन बारीक किसून त्यात साखर थोडी चवीप्रमाणे व लिंबु१ पिळून टाकणॆ,
त्यावर जिरे,हिंग मोहरीची, फ़ोडणी गाजराची कोशिंबिरीवर घालणे.ही झाली साधी सोपी
गाजराची कोशिंबिर. ती खुप स्वादिष्ट लागते.

Tuesday, April 22, 2008

आजीबाईच्या बटवा-

१ जखम झाल्यास त्या जखमेवर थोडी हळदीची पुड टाकावी.जखम लगेच बरी होईल.
२ अपचनाचा त्रास झाल्यास आल्याचा रस प्यावा.
३शिकेकाई १००ग्रँम, नागरमोथा १००ग्रँम, रिठा ५०ग्रँम, बेहडा१००ग्रँम, आवळा पावडर५०ग्रँम ,
पावडर करुन केस धुवावेत.
४ चेह्र-य़ाला साबण न लावता बेसन पीठात थोडी हळद कालवुन फ़ेसपँक १५मि.लावणे.
५ लहान मुलांना आंघोळीच्या आधी तीळीचे तेल वापरावेत त्वचा मुलायम होते.

-लस्सी-
साहित्य- (दही, साखर चवीप्रमाणे , थोडस मीठ,बर्फ़ १-२)
प्रथम मिक्सरचा एका भांडयात थोडे घट्ट दही घेऊन त्यात साखर चवीप्रमाणे (मीठ) घालून
मिक्सरमध्ये घट्ट दही फ़िरवून घेणे ही तुमची आवडती लस्सी तयार झाली आहे.
चला मग तयार करुन पाहूया!

Saturday, April 19, 2008

स्ट्राँबेरी आईस्क्रीम


- स्ट्राँबेरी आईस्क्रीम-
साहित्य- आटवलेले अर्धा लिटर दुध, ताजी पिकलेली स्ट्राँबेरी २०० ग्रँम, १००ग्रँम साखर, २थेंब स्ट्राँबेरी कलर.
कॄति: स्ट्राँबेरी स्वच्छ करुन मिक्सर मध्ये फ़िरवुन घ्या.त्यातच दुध साखर घालुन पुन्हा मिक्सर मध्ये फ़िरवुन घ्या. हे मिश्रण सेट होण्यास फ़्रिज मध्ये ठेवा.स्ट्राँबेरी आईस्क्रीम तयार होईल.

Friday, April 18, 2008

- गुलाबजाम-


साहित्य- खवा२५०ग्रँम, पनीर ५०ग्रँम, आरारोट पावडर५०ग्रँम, थोडे केशर,वेलची पुड १चमचा.
कृति- खवा, पनीर, आरारोट पावडर, वेलची पुड मिक्स करा. खवा त्याचे छोटे छोटे गोळे करुन
तूप गरम करुन ते छोटे गोळे लालसर रंगावर तळावेत. साखरेचा एकतारी पाक करुन छोटे गोळे पाकात टाकावेत.लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत हा गोड पदार्थ सर्वांनाच खुप आवडतो.
मग लागा तयारीला.

Thursday, April 17, 2008

पापलेटची आमटी

साहित्य- २मोठे पापलेट, २०ग्रँम मिरची,२मोठे चमचे धणे, १वाटी ओले खोबरे, थोडा कांदा,
८अमसूल(कोकम), थोडी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ.
कृति- पापलेटचे तुकडे कापून व धुवुन हळ्द, मीठ,लिंबाचा रस लावुन १५मिनिटे ठेवणे.
कांदा सर्व मसाला वाटून घावा. तेलात मसाला शिजला की पापलेटचे तुकडे टाकावेत.
पापलेटचे तुकडे शिजवावेत.

Tuesday, April 15, 2008

suvichar, joke, kayva

सुविचार- मानवता हाच खरा धर्म आहे.
जोक्स
१) राणी सकाळी" शेजारची ही काळी मैना लागाली डॊलायला"
म्ह्टलावर गल्ली मधली मुले अचानक आवाज एकून रडायला लागलेत.
प्रत्येकाच्या जीवनात आनंद फ़ुलविणारा दिवस-
बालपण-
एका आईची ह्नदय स्पर्शी प्रेमळ ममता आणि
जीवन देणारी व जगू देणारी आईची ह्नदय स्पर्शी प्रेमळ ममता ग!
आई महान तुझी पुण्य़ाई किती थोरवी गाऊ मी आता
तुझाच पदरी आली आई मी किती भाग्यवान होती ग!

करिअर-
प्रत्येकाच्या जीवनात येणारी चढाओढ
म्हणजे करिअर
करिअर म्हणजे एखाद्या घट्ट दोरीला पकडुन धरणे.
दोरी सुटली तर करिअरचा दोरी सुटून जाईल.

Monday, April 14, 2008

टिप्स* आणि लिंबाच गोड लोणचं

* टिप्स*

१) भेंडीसारखा चिकट भाज्यामध्ये १चमचा पीठ टाकुन परतल्यास त्याचा चिकटपणा कमी होतो.
२) नेलपाँलिशची बाटलीचे झाकण पँक बसल्यास झाकणाला व्हँसलीन लावावे.
३) डायफ़ुट टाईट एअर भांडयात बंद करुन ठेवा डायफ़ुट जास्त काळ टिकतील.
४) शेंगदाणाची चिक्की झाल्यानंतर त्या ताटाला तुपाचा हात लावुन मगच शेंगदाणाची चिक्की
ताटात काढुन घ्यावीत . शेंगदाणाची चिक्की ताटाला चिकटते नाही.
*************************************************************************************
- लिंबाच गोड लोणचं- साहित्य- २५ लिंबु,एक सपाट वाटी लाल तिखट, अंदाजे मीठ, १चमचा मेंथी, १किलो साखर

२चमचे हळद, २चमचे हिंग, व तेल.
कॄति:- लिंबु धुवून व कोरडे पुसून त्यांच्या फ़ोडींना मीठ व हळद, साखर, तिखट लावुन आणि
मेंथी तेलात तळुन घेतल्यावर एका काचेचा बरणीत लिंबुच्या फ़ोडीना मीठ व हळद,

साखर, तिखट लावुन झाल्यावर काचेचा बरणीत लोणचं भरणे व उन्हात बरणी ठेवुन
६ दिवस मुरत ठेवणे.हे लिंबाच गोड लोणचं लहान मुलांना फ़ार आवडते.

Sunday, April 6, 2008

गुढीपाडवा सण आला ग ताई!

गुढीपाडवा सण आला ग ताई!

आपला दारी मांगल्याची सुखाची
गुढी ऊभारली दारी ग!
गुढीपाडवा सण ज्या दिवशी दारी गुढी ऊभारली जाते.
त्यादिवसापासुन नवीन लिपईयर आणि शुभ दिवसापासुन
सुरुवात झाली असे म्हणतात. ताई, आजी, मावशी , सुन अंगणात पाण्याच्या
सडा व पुरणपॊळी घरी तयार करतात. घराच्या बाहेर फ़ुलांच्या माळा तोरण तयार करतात.
असा पांरपारिक सणाचे मह्त्त्व काही भारतात सण साजरे केले जातात.


***************



मेकअप कसा करावा - १ चेहराला विंल्नझिंग करुन चेहरा कापसाने स्वच्छ करावा.
२ चेहराला हर्बल ब्युटीक लेप लावणे.१५मि.चेहरा पाण्याने स्वच्छ करावा.
३चेहराला बेस्ट फ़ांउडॆशन लावणॆ .
४ मेकअप कीट वापरणे.
५ लिस्पटीक लावणॆ.
*************