Sunday, July 19, 2009

कोको केक


वाढदिवसाचा दिवशी केकची मजा कापायची काही निराळीच असते त्यादिवशी नवीन कपडे घालायला मिळतात ,केकभवती विविध कल्ररचा मेणबत्तीने वाढदिवस साजरा करतात मी आज कोको केकची रेसीपी देत आहे.मी याच माहिनात माझी ही रेसीपी तयार करुन बघणार आहे आणि मी माझा वाढदिवस साजरा करणार आहे.

कोको केक
साहित्य:- एक पेला मैदा,तीन चतुर्थाश पिठीसाखर, २अंडी, अर्धा पेला बटर, पावपेला मिश्र ड्रायफ़्रुट,अर्धा पेला दूध,एक चमचा
लहान बेकिंग पावडर,एक मोठा चमचा कोको पावडर,पाव चमचा इन्सेस .
कृती:- लोणी व साखर हलके होईपर्यत फ़ेटा.मैदा+बेकिंग पावडर मिसळून चाळा. थोडासा मावा दूधात भिजवावा. अंडी फ़ॊडुन इन्सेस त्यात घालून फ़ेटा.व त्या लोणी +साखर+बटर फ़ेटलेलात हळूहळू फ़ेटलेले अंड मिसळा मग मैदा मिसळा आणि दूध मिसळून थोडे फ़ेटा .मग मोल्डमध्ये टाका.आणि उच्च तापमानावर १० मि. केक बेक करा.त्यावर मिश्र ड्रायफ़्रुट सजावट करा.
आणि खायला द्या. आपला प्रतिक्रिया जरुर कळवा..