Monday, October 24, 2011

रवा बेसन लाडू



साहित्य- २वाटया जाडसर रवा,१वाटी भरून हरभरा डाळीचे पीठ,५वेलदोडाची पूड,आवडीप्रमाणेड्रायफ़्रुट घालावेत,पाव किलो तूप,२वाटया साखर,१वाटी पाणी,
कॄति- पाऊण वाटी तूप घालून रवा मंद आचेवर खमंग भाजा ,उरलेल्या तुपात डाळीचे पीठ भाजून त्यावर दूधाचा हबका देणे,साखरेचा पाक करावा,एकतारी पाक झाल्यावर त्यात रवा,बेसन ,वेलची घालणे,थंड झाल्यावर लाडू तयार होतील तूम्ही हे लाडू घरचा घरी बनवू शकतात.
हे लाडू करताना पाक जास्त घट्ट झाला तर लाडू कोरडे होऊ नये म्हणून दुधाचा हबका देणे.हे लाडू ८ते १० दिवस टिकतात.तर अवश्य करून पहा हे लाडू...