Sunday, May 29, 2011

एक गोड खमंग डीश गुलाबजाम

साहित्य- १किलो ताजा खवा
१किलो साखर
२००ग्रँम मैदा
१मूठभर रवा
१चिमूटभर बेकिंग पावडर
१ कप कोमट दुध
कृती- प्रथम वरील प्रमाणात मैदा,खवा, १ चिमूटभर बेकिंग पावडर,१मूठभर रवा,हे सर्व कोमट दुधात एकत्र करुन मिश्रण एकजीव करावेत त्यानंतर भिजवून १५मि.बाजुला ठेवावेत.नंतर याचे छोटे गोळे करुन (गावराणी/डालडा आपल्या सोयीनुसार उपलब्ध) तुपात तळून घ्या.तळुन झाल्यानंतर साखरेच्या पाकात हे गुलाबजामचे गोळॆ थंड झाल्यावर टाका .आता पहा चविष्ट ,लज्जतदार,गोड पदार्थाची डिश तयार आहे.
मी गुलाबजामच्या निरनिराळ्या रेसिपि सादर केल्याच आहे. त्यात हा माझा गोड पदार्थ सणासुदीला निश्चित करुन बघा आणि आभिप्राय जरुर कळवा.

Friday, May 27, 2011

चेह-याचे सौंदर्य कसे खुलवा...!

१) आठवडयातुन एकदा तरी चेह-याला हळदीचा लेप लावावा हळद ही निर्जंतूक असल्याने त्वचा ऊजळते काळे डाग जातात.
२) मसुरडाळीच्या पीठात बेताने पाणी किंवा दूध टाकून चेह-याला घट्टसर लेप लावल्यानंतर ५मिनिटांनंतर चेह-यावर पीठाला स्क्रबर प्रमाणे चोळावे त्यामुळे काळ्पट
पणा जाऊन पिंपल नाहीसे होतात.
३) बदामाचे तेल डोळ्याभोवती लावल्याने डार्क सर्कल नाहीसे होतात.
४) त्वचेचा रंग उजळण्यासाठी कापुर तेल हलक्या हाताने चेह-याला चोळावे.
५) कडूलिंबाचे थेंबभर तेल चेह-यावर पिंपल असल्यास लावल्याने पिंपल समुळ नष्ट पावतात .

Sunday, May 22, 2011

चेहराची काळजी अशी घ्यावी

१) पपईचा कापा स्नान करण्यापूर्वी १५ मिनिट चेह-यावर लावा चेहरा उजळून येतो.
२) काकडी किसून चेह-यावर लावल्यास काळपटपणा जातो.
३) रात्रीला चेह-यावर कोल्ड क्रीम लावावे.
४) मेकअप करण्यापूर्वी माँश्चराँयझर लावावे.
५) रात्री चेह-यावर स्क्रब केल्यास चेह-याच्या डेड पेशी निघुन जाण्यास मदत होते.
६)अधुन मधुन बदामाच क्रिम चेह-याला लावा.
७) पिंपल कधीही फ़ोडू नये चेह-याला१चमचा मुलतानी माती, १चमचा चंदन पावडर, गुलाबजल मिसळून पिंपल असलेल्या भागावर
लावा.पिंपल नष्ट होतील.

Saturday, May 21, 2011

मुलतानी मातीचे फ़ायदे

मुलतानी माती लावल्यामुळे चेह-यावरील डाग,सुरकुत्या नाहीसे होतात.
चेह-यावर मुरुम झाली असल्यास छॊटा चमचा मुलतानी माती व बेसन पीठ,थोडीशी हळद पुड टाकून पेस्ट बनवा चेहराला लेप आठवडयातून २वेळा लावा. चेहरा स्वछ होईल.उन्हामध्ये कांळवंडलेल्या चेहरावर मुलतानी माती लावल्यामुळे चेहरा उजळवून स्वछ होईल
मुलतानी मातीत तुमच्या सौंदर्यात भर घालते.मुलतानी माती लावल्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होईल.

Monday, May 16, 2011

घरगुती टीप्स-

१)टॊमँटोला कुस्करुन चेह-यावर लेप लावल्यास चेहराला चमक येते.
२)घाम जास्त येत असल्यास पाण्यात तुरटी टाकून स्नान केल्यास ताजेतवाने वाटते.
३)आवळा भाजून खाल्ल्याने खोकला दूर होतो.
४)१चमचा शुध्द तुपात हींग मिसळुन प्यायलाने पोटदुखी दूर होते.

Sunday, May 15, 2011

गुलाबजाम मिल्क पावडरचे

साहित्य- ९टेबलस्पुन मिल्क पावडर,३टेबलस्पुन मैदा,१टीस्पुन बेकिंग पावडर,१चमचा गरम तुप,थोडे दूध,पाकाकरिता साखर,पाणी.
कॄति-प्रथम ९टेबलस्पुन मिल्क पावडर,३टेबलस्पुन मैदा,१टीस्पुन बेकिंग पावडर घेऊन त्यात,१चमचा गरम तुप,थोडे दूध टाकून वरील मिश्रण खव्याप्रमाणे मऊ झाले पाहिजे लगेच मध्यम आकाराचे गोल गोळे करुन कढईत मंद आचेवर तळून घावे.नंतर एकतारी पाक करावा त्यात
गुलाबजामचे गोल गोळे टाकावेत खाण्यासाठी तयार आहे मिल्क पावडरचे गुलाबजाम.
टिप- गुलाबजाम मंद आचेवर तळावे त्यामुळे एकसारखा रंग येतो.
खवा नसल्यास मिल्क पावडर वापरावी

Tuesday, May 10, 2011

टीप्स
१)बिर्याणी करतांना त्यावर कांदा तळून घेतल्यानंतर साखर थोडी वरुन टाकावी.
२)डॊशाचा पिठ वाटताना त्यात मूठ्भर भिजवलेले पोहे घालावे.
३)थालीपीठ थापताना ओला प्लास्टिकचा कागदावर थापवून घावे.
४)डोसा करताना कांदा तेलात बुड्वून तव्याला फ़िरवावा त्यामुळे डोसा चिटकत नाही.


उन्हाळा महिना तीव्र उष्णतादायक आहे त्यामुळे आहारात नेहमी शीतपेयाचा समावेश करावा उन्हाळ्यात थंडावा देणारे शीतपेय म्हणजे कैरींच पन्हं आहे,

-,कैरींच पन्हं .-
साहित्य- २कै-या, साखर १वाटी,थोडी वेलची पूड,थंड पाणी.
क्रूति- कै-या उकडून घेणे व साल सोलून कै-याचा गर काढून त्यात साखर, वेलची पूड, मिक्सरमघ्ये फ़िरवून घेणे ,थंड पाणी टाकून आता कैरींच पन्हं पिण्यासाठी तयार आहे.

Monday, May 9, 2011

**काय खावू नयेत:**

१) दूधासोबत सर्व प्रकारांची फ़ळे सेवन करू नये.तसेच चिंच,नारळ,बेल,मुळा त्याची पाने,दुध व गुळ खावू नयेत अपायकारक आहे.
२) दही बरोबर खीर,पनीर,गरम जेवण घेऊ नयेत.
३) तुपाबरोबर सम प्रमाणात मध घेणे अपायकारक आहे.
४) मासे बरोबर दुध मध, आईस्कीम खाणे टाळले पाहिजे.
५)मटना बरोबर मध,पनीर खाल्ल्याने पोट बिघडते.

थंडागार मठ्ठा
साहित्य: १००ml दही,साख्रर २चमचे,मीठ १चमचा,आले,लसूण,मिरची पेस्ट,१चमचा चाटमसाला,जलजीरा ,फ़ोड्णीसाठी तुप,जीरे.मोहरी,थोडासा हींग. कढिपत्ता.
कॄति;-प्रथम दही व थोडे पाणी टाकून ब्लेडरला फ़िरवून घेणे,व त्यात मीठ, साखर ,लसूण,मिरची पेस्ट,१चमचा चाटमसाला,जलजीरा ,फ़ोड्णीसाठी तुप,जीरे.मोहरी,थोडासा हींग. कढिपत्ता घालून चमचाने ह्लवा आता पिण्यासाठी तयार आहे थंडागार मठ्ठा.