Monday, December 10, 2007

अंडयाशिवाय केक (फ़्रुट केक)


साहित्य:-गोल मोठी चेरीचे पाकीट, मैदा २ कप, लहान चेरीचे पाकीट(टुटीफ़ुटी), फ़ळांचे तुकडे ( पायनापल, सफ़रचंद चीकू, यांचे तुकडे,लिंबाचा रस १ चमचा, अर्धा चमचा कार्नप्लावर, व बेकिंग पावडर अर्धा चमचा, पायनापल इन्सेस,
केकचे पात्र.
कॄति:- मैदा२कप घेऊन ३वेळा चाळणे व त्त्यात अर्धा चमचा कार्नप्लावर टाकुन व बेकिंग पावडर अर्धा चमचा टाकवीत.पिठी साखर १कप, व त्यात लोणी अथवा, तुप थोडे लागता लागता या वरील कॄतिमध्ये मैदा,बेकिंग पावडर, एकजीव फ़ेटावेत व सारखे फ़ेटावेत व पातळ मिश्रणात डायफ़्रुटचे बारीक तुकडे व फ़ळांचे तुकडे-गोल मोठी चेरी घालणे व केकचे पातळ मिश्रण केक पात्रात ओतुन ओव्हन मध्ये १८० डि.ग्री. से.लि.वर रंग येईपर्यत केक ओव्हन मध्ये चाकलेटी कलर वर भाजणे
केकआयसिंग- केकआयसिंग, करता आयसिंग पावडरचे पाकीट आणणे,पिठीसाखर थोडी थोडी लोण्यामध्ये चमच्याने फ़ेटत जावे हे मिश्रण पांढरे कलरचे केकआयसिंग तयार झालेला केकला आयसिंगक्रीम सुरीने केकला लावावेत व कोको पावडर पिठी साखर थोडी थोडी घालणे आयसिंग पावडरमध्ये घातल्यावर चाकलेट आयसिंगक्रीम कोनमध्ये भरुन डिझाईन काढणे.

Friday, December 7, 2007

सुपांचे प्रकार.


हेजिटेबल अँन्ड नुडल्स सुप साहित्य:- १/२ वाटी प्लावर कोबी, २ कप पत्ता कोबी, २गाजर, १० बीन्स (फ़रसबी), ४ कांदे, १वाटी उकडलेले नुडल्स
१टे.स्पु सॊयासाँस व मीठ.
सर्व भाज्या बारीक कापुन तेलात टाकुन ३ते ४मि. परतावे . ६कप पाणी व नुडल्स मीठ घालणे व ५मि. शिजवुन
चिली साँस सॊयासाँस टाकुन हेजिटेबल अँन्ड नुडल्स सुप सर्व्ह गरम करणे.

स्वीट कार्न सुप साहित्य:- २मोठे कणीस, १टीस्पुन सॊयासाँस, कार्नप्लावर, साखर थोडीशी, ४लसुण पाकळ्या व आलं कुटुन घालणे, मिरीपुड थोडीशी व मीठ.
२मोठे कणीस किसुन त्यात ६कप पाणी घालुन कुकरमध्ये शिजवुन २कप पाण्यामध्ये कार्नप्लावर मिक्स करुन
कुकरमध्ये शिजवुन घेतलेला ६कप पाणी घालतलेला कणीस किसलेल्रे मिक्स करणे.
(एका भांडयात सुप काढुन त्यात वरुन लसुण पाकळ्या व आलं कुटुन घालणे, मिरीपुड घालुन
एक उकळी येईपर्यत गँसवर ठेवा व गरमा गरम कार्न सुप सर्व्ह करणे.)

प्राजक्ता

घडयाळात पहा किती वाजलेत.

Tuesday, December 4, 2007

आपल्याला मिळालेले आधुनिक नवे तंत्रज्ञान एक वरदानच.

<
मानवाला मिळालेला सर्व सुखसोई उदा. संगणक हे तंत्रज्ञानामुळे मानवाला शोध लागत आहेत, हे एक वरदान मानवाला मिळालेले आहे.त्याशिवाय जे काही शॊध लागले त्यात मानव यशस्वी झाला आहे, हे तंत्रज्ञानामुळे मानवला सुख-सम्रुद्धी मिळत आहे.फ़िज मुळे मानव आपली तहान तसेच मायक्रो ओव्हन मुळे भूक भागवतो.
अन्न, वस्त्र, घर मानवाला मिळालेला सर्व सुखसोई त्याचा बुध्दीने मिळ्वू शकतो. टीव्ही मुळे
जगातल्या घडामॊडी समजतात, ते मंनोरजनाचे साधन होय.

Monday, December 3, 2007

बटाटे वडे


प्राजक्ताची खंमंग मराठी रेसिपी ती सूध्दा मराठी ब्लाँगवर वाचायला ...पहायला ..करायला विसरु नका ..माझ्या मराठी ब्लाँगवर आपला अभिप्राय अवश्य कळवा......पहात रहा..बनवत रहा...चायनीज पाककला आणि इतर टिप्स आणि आणखीन सारे ...




१)साहित्य- १ किलो बटाटे, अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली, मीठ चवीप्रमाणे, तळण्यासाठी तेल.
(कव्हरींग करता पीठ कसे तयार कराबे पुढीलप्रमाणे )-

(साहित्य)- २वाटया बेसन पीठ, १/२ टीस्पुन हळद, २वाटया पाणी, मीठ, (बेसन पीठात हळद,मीठ,पाणी, घालुन पीठ
भिजवावेत)

कृ्ति-बटाटे कुकर मधुन उकडून घ्यावेत. बटाटेची साले काढुन बारीक चिरावेत नंतर त्यात मसाला,मीठ घालुन एकत्र करुन,बटाटांचे छोटो गोळे करुन ठेवावेत. एका कढईत तेल गरम कडकडीत झाल्यावर एकेकच छोटो गोळे त्त्यावर कव्हरींग करता पीठ बेसन पीठात बुडवणे, गुलाबी रंगावर झाल्यावर बटाटे वडे बाहेर काढावेत. (बटाटे वडे महाराष्ट्रीयन डीश आहे).

Saturday, December 1, 2007

खमंग कढी

साहित्य:- दही,१चमचा बेसन पीठ, कढीपत्ता , आलं, लसुण मिरची पेस्ट तेलात फ़ोडणीमध्ये जिरे, मोहरी, हिंग, ४ मेंथी दाणे, दही( दही मिक्सर मधुन पाणी टाकुन मिक्सर मधुन बेसन पीठ दही टाकुन घुसळणे).
कॄती-दही मिक्सर मधुन घुसळणे व एका भांडयात फ़ोडणीत आलं, लसुण मिरची पेस्ट तेलात जिरे, मोहरी,
हिंग, मेंथी दाणे घालुन फ़ोडणी ओतणे (दही मिक्सर मधुन काढुन वरुन फ़ोडणी ओतणे ) उकळी कढीला येऊ
देणे.गरम सर्व्ह करणे.साधी सॊपी खमंग कढी अशी तयार करावी.
खमंग कढी कशी तयार झाली त्याबद्द्ल अभिप्राय कळावेत. खमंग कढीचे खुप प्रकार आहेत .
(सिंधी कढी देखील आहे.
ही खमंग कढी महाराष्ट्रीयन आहे व तो दहीपासुन बनलेला पदार्थ कढीहा आहे).

Thursday, November 29, 2007

कोथिंबीर वडी


साहित्य-
१जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन पीठ २वाटया, २चमचे तिखट, मीठ चवीप्रमाणे, धणे जिरे ओवा पावडर
कॄती- १जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर मध्ये २वाटयाबेसन पीठात तिखट, मीठ चवीप्रमाणे, धणे जिरे ओवा पावडर
व बेसन पीठात पाणी घालुन चिरलेली कोथिंबीर सर्व साहित्य थोडे घट्ट पाण्यात मिक्स करुन प्रेशर कुकर
मध्ये भांडयात ढोकळा प्रमाणे पीठ कुकरचा भांडयात ओतुन प्रेशर कुकरची शीटी काढुन वाफ़ेवर कोथिंबीर वडी
झाली की सुरीने वडी कापुन गरम तेलात तळणे व सर्व्ह करणे.
बनवून पहा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

Tuesday, November 27, 2007

पिझ्झा :-

पिझ्झा
साहित्य:- ४ पिझ्झा ब्रेड, १/४ किलो पत्ता कोबॊ, २-३ सिमला मिरची, २-३ टोमटो चिमुटभर मिरी पावडर, १/४ टीस्पुन
मीठ व साख्रर, अमुल बटर, चीझ, पाववाटी साँस , सोयासाँस, ग्रीन चिली साँस, तेल.

कॄती: - कोबी व सिमला मिरची उभी बारीक चिरावीत आणि पँन मध्ये तेल गरम झाल्यावर कोबी व सिमला
मिरची घालुन २-३ मि. गँसवर परतावेत मीठ व साख्रर, मिरी पावडर, घालुन एकत्र करावा नंतर पिझ्झा ब्रेडला
अमुल बटर लावुन ब्रेडच्या सपाट भागावर टोमँटो साँस व टोमँटो भाजी, स्लाईस ब्रेडवर पसरावीत वरुन चीझ स्लाईस ब्रेडवर पसरावीत ओव्हन मध्ये १० मि. पुर्ण भाजत ठेवावे. पिझ्झा गुलाबी रंगावर भाजुन झालाकी बाहेर काढावा.
चीझ स्लाईसवर घालुन पिझ्झा सर्व्ह करणे.


एक गोष्ट: माणसाला अति लोभाचे फ़ळ व त्यातुन न मिळणे हेच फ़ळ मिळते.
मनुष्य जरी कितीही गरीब असला तरी अति लोभ व धन मिळावे यासाठी एका गोष्टीत सॊन्याच्या कोबडीचा जीव घेऊ शकतो.तर मग मनुष्य अति लोभात पडुन सॊन्याच्या कोबडींचा जीव घेतो मग धन त्यातुन न मिळणे हेच फ़ळ मिळते त्त्यामुळे मनुष्याने अति धन मिळण्याच्या प्रयत्त्न करु नयेत. त्यातुन हेच शिकण्यास मिळते की मानवामध्ये व प्राण्यामध्ये परमेश्वर आहे. त्याला मारण्य़ात पाप घडते, लोभ माणसाने निर्माण झाला आहे. लोभात जे मिळत नाही ते परमेश्वरात लीन
होणे महत्वाचे आहे.
परमेश्वरात प्रार्थनेतच मनुष्याचे ख्ररे सुख आहे.

Saturday, November 17, 2007

स्पींग रोल , घरगुती टिप्स आणि कविता.

दिवाळी - कविता
हासत आनंदी दिवाळी
ही माझ्या दारी आली
करु तिचे स्वागत.
पुजा करोनी
मंगलमय वातावरण बहरले.
प्राजक्ताचा सडा पडुनी
गुलाबी थंडीत न्हाऊ दे
लावुनी दिप- पणती
ऊजळु दे ज्योती लक्ष-लक्ष
हीच खरी समुध्दी
अन धन मिळु दे आम्हा
दिप प्रकाशाचे ऊजळु दे दारी .
-----------

** स्पींग रोल**
साहित्य:- ५/६ बीन्स, १गाजर, १कप कोबी, १वाटी नुड्ल्स उकडलेला, २ कांदे, १टी स्पुन सर्व साँस घालणे १/४ कडधान्य
मोड आलेले, तेल, मीठ.
कृति- एका कढईत २ टे. स्पुन तेल गरम झाल्यावर सर्व भाज्याचे लांब तुकडे करुन गरम तेलात टाका, मोड आलेले

कडधान्य पण घाला २/३ मि. भाज्याचे तुकडे तेलात परतवा त्यात नुड्ल्स उकडलेला, मीठ चवीप्रमाणे(गँस बंद करणे.)
मैदा+ पाणी व तेल, मीठ सर्व एकत्र करुन घट्ट गोळा करुन १/२ तास झाकुन ठेवा त्याचे लहान घट्ट गोळे करुन
पुरी एवढे लाटुन भाज्याचे तुकडे सर्व एकत्र करुन पुरणाचा सारणा सारखे भ्ररावेत व मैदाच्या पेस्ट पुरीला लावुन
मैदाच्या लाट्लेल्या पुरीचा रोल करुन तेल गरम झाल्यावर दुस-या कढईत तयार झालेले स्पींग रोल तळणे.


*** घरगुती टिप्स ***

* वांगे भाजण्यापुर्वी तेलाचा हात लावावा.
* वरण उरले असल्यास त्यात सर्व पिठे मिसळुन दशमीचे पिठ तयार होते.
* भाज्या शिजवतांना त्यामध्ये चिमुटभर खायचा सोडा टाकल्यास भाज्याचा रंग टिकतो.
*भाज्या फ़ार बारीक चिरु नयेत त्यामुळे त्यातील जीवनस्त्वे नष्ट होतात.
* गव्हाचा पिठात सोयाबीनचे पिठ मिसळावे.

Tuesday, November 13, 2007

** अमेरिकन चाप्से**
साहित्य:- २वाटया पत्ता कोबी, २ कांदे, मोड आलेला उसळी( मटकी, हरभ्ररे, मुग, कुकर मधुन ऊकडुन) बीन्स १वाटी ,
२गाजर, १ वाटी हाका नुड्ल्स उकडलेले, १वाटी तेलामध्ये तळलेले फ़्राईड हाका नुड्ल्स, सर्व साँस घालणे.
कॄती: प्रथम सर्व साँस भांडय़ात उकळुन घट्ट साँस करा व त्यात १/२ झाकण व्हिनेगार, साखर ३चमचे, पाणी २कप,१चमचा कार्नप्लावर, तेलात सर्व भाज्याचे उभे तुकडे करुन परतवा. ३मि. भाज्या वाफ़वावे मीठ टाका, १
वाटी हाका नुड्ल्स उकडलेले, १वाटी तेलामध्ये तळलेले फ़्राईड हाका नुड्ल्स त्यात सर्व साँस आवडीप्रमाणे घालणे चिली साँस व मीठ मिश्रण एकजीव करा. वरुन तळलेले फ़्राईड हाका नुड्ल्स घालुन सर्व भाज्या साँसमध्ये टाकुन तयार
झालेली गरमा गरम डिश सर्व्ह करणे.

( *** बटाटे पँटिस***)
साहित्य:- ३ बटाटे ऊकडुन, व लसुण पेस्ट, त्यात ब्रेडचा चुरा, तेल तळ्ण्यासाठी, तांदुळाचे वरुन पीठबटाटे पँटिसला,
कॄती: पराठाचा सारणा सारखे एकजीव करणे पँटिसला हातावर पुडिंग करावेत. ब्रेडचा चुरा घालुन त्यात मीठ,
तिखट, कोथिबीर घालणे. तांदुळाचे वरुन पीठ बटाटे पँटिसला लावुन बटाटे पुडिंग थोडा तेलात तळावेत
तुमची बटाटे पँटिस ( बटाटे पुडिंग थोडया तेलात फ़्राय करु शकता) ही डीश गरमा गरम सर्व्ह करणे.


** मिवस डाळीचा वडा**-
साहित्य:- दिड वाटी हरभरांची डाळ, १वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ,, डावभर बेसन पीठ, ६-७ हिरवा
मिरच्या ६-७ लसुण, मीठ, तेल.पालक चिरुन, कोथिबीर.
कॄती: सर्व डाळी रात्री वेगवेगळया भिजत घालुन मिवसर मधुन डाळी काढणे. लसुण हिरवा मिरच्या, आलं वाटण.
करणे. पालक चिरुन बेसन पीठात लसुण हिरवा मिरच्या, आलं वाटण एकत्र मिवस कालवुन.
प्लास्टीकचा कागदावर वडे थापुन गरम तेलात तळणे व डीश गरमा गरम सर्व्ह करणे.

Friday, November 9, 2007

चायनीज पाककला.....
( चायनीज पाककला..... )

१ ) *** चायनीज हक्का न्युड्ल्स.*** -
साहित्य-
१०० ग्रम चायनीज हक्का न्युड्ल्सचे पाकिट, १ वाटी उभी चिरलॆलि पत्ता कोबी. १ वाटी सिमला १ वाटी उभी चिरलॆलि हिरवी मिरची १ वाटी कांदा उभा चिरलेला. १ वाटी टॊमाटो . आल लसुण पेस्ट व मिठ,सोयासास. चिलिग्रिन सास. टॊमाटोसास आवडी प्रमाणे टाकणे.कोथिंबिर
** कृ्ति.-प्रथम एका भांड्यात तेल १चमचा मोठा घेणे. वरिल सर्व भाज्या भांड्यात तेलात शिजवुन घ्याव्यात नंतर दूस-या पातेल्यात ऊकळ्लेल्या पाण्यात नुड्ल्स तुकडे न करता शेवयांप्रमाणे पाण्यातुन बाहेर काढावे व पुन्हा कढईत त्या नुड्ल्स घेउन शिजवुन घेतलेल्या भाज्यांमध्ये मिक्स करुन वरील कृतिप्रमाणे त्यात सोया सौस,टमाटो सौस आवडीप्रमाणे थोड्या प्रमाणात घालणे.नंतर तुमची ही चायनीज हक्का न्युड्ल्सची गरमा गरम डीश नाष्टासाठी तयार आहे.तर मग लागा तयार
करायला.



***************************************************************





**** केसांची निगा -*****
) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.
२) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु पिळवा हे पाणी शाम्पुसारखे वापरावे.
३) कडुनिबांची पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस मजबुत तर होतातच शिवाय केस ही गळ्तही नाहीत.
४) जास्वंद जेलने केस गळ्त असल्यास मसाज व कोरफ़ड जेलने केसांना मसाज करावा .
५) शिकेकाई पाण्यात उकळुन हे पाणी शाम्पुसारखे वापरावे त्यामुळे केस चमकदार होतील.
६) मेहंदी पावडर एक पाकीट १०० ग्रॅम घेउन त्यात १चमचा चहापावडरचे पाणी उकळुन त्या मिश्रणात १ चमचा कॉफ़ी पावडरचे पाणी उकळुन त्यात १ चमचा काथा पावडर त्यात घालावी. ही मेहंदी केसांना २ तास ठेवावी. केस सोनेरी रंगाचे तर होतीलच. शिवाय मुलायम पण होतील .

*************************************************

*** चायनीज फ़ाईड राईस***-
साहित्य- अडीच वाटी बासमती तांदुळ, १ वाटी बीन्स( फ़रसबी) ,१ वाटी उभे तुकडे गाजरांचे, १ वाटी पत्त्ता कोबी, १ वाटी कोथबिर १ वाटी वाटाणे, १टीस्पुन सोयासोस व टोमाटॊ केचअप , तेल, मीठ.
कृ्ति- प्रथम तांदुळ पाण्यात शिजवावा( प्रेशर कुकर मधुन तांदुळ पाण्यात शिजवावा. प्रेशर कुकरचे झाकण न
लावुन).व सर्व भाज्याचे उभे तुकडे करावेत. कढईत सर्व भाज्याचे तेलात उभे तुकडे शिजवणे त्यात पाण्यात शिजवलेला भात कढईत घालणे त्यात १टीस्पुन सोयासोस व टोमाटॊ केचअप घालणे. गरमा गरम चायनीज फ़ाईड राईस डीश सर्व्ह
करणे.
*******************************************************

*** गोल्डन स्कोअर***-
साहित्य- ब्रेडचे स्कोअर आकारात कापलेले १२ ब्रेडचे स्लाईस घेणे, कांदे २, गाजर २, १ वाटी बीन्स( फ़रसबी) १ वाटी सिमला मिरची, २बटाटे उकड्लेले ,सोयासोस व टोमाटॊ केचअप व आलं मिरची पेस्ट,४ ब्रेडचा स्लाईसचा चुरा, मैदा १/२.मीठ व १ वाटी कोथबिर, (२बटाटे उकड्लेले कुस्करणे).

कृ्ति- सर्व भाज्याचे बारीक तुकडे करावेत. तेल गरम झाल्यावर भाज्याचे बारीक तुकडे कढईत घालणे परवतणे. ब्रेडचे स्कोअर आकारात कापलेले १२ ब्रेडचे स्लाईसवर मैदा+ पाणी ते ब्रेडवर पेस्ट करुन. व .सोयासोस व टोमाटॊ केचअपभाज्या शिजवुन भाज्या सर्व ब्रेडवर स्कोअरध्ये स्लाईसवर भाज्या सर्व ब्रेडवर भ्ररणे. मैदा+ पाणी ते ब्रेडवर पेस्ट करुन स्कोअरध्ये स्लाईसवर पेस्ट पसरवावे, स्लाईसची बाजु बंद करणे .ब्रेडवरचे स्लाईस मैदा+ पाणी घट्ट यांचे मिश्रण करणे.सर्व ब्रेडवरचे स्कोअरध्ये स्लाईस गरम तेलात तळणे( फ़िश सारखे फ़्राय करणे).टोमाटॊ केचअप बरोबर गोल्डन स्कोअर डीश गरमा गरम सर्व्ह करणे. लहान मुलांनागोल्डन स्कोअर डीश गरमा गरम खायला आवडेल व जास्तीचा ब्रेड वाया जात असल्यास गोल्डन स्कोअर डीश आपण ही चायनीज पाककला बनवावीत. टीप-( चायनीज पाककलेत अजिनोमोटो या मीठामुळे ह्रुदय रोग उदभवतो २ चुट्की घालणे)

***सौंदर्य प्रसाधने च त्वचेची निगा***
* चेहरा नेहमी क्लिन्झिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करणे,किंवा कच्चा दुधात लिंबु पिळुन चेहरा स्वच्छ करणे.
*त्वचेला मुलतानी माती पावडर, चंदन पावडर या पावडरचा फ़ेसपॅक त्वचेला १५मि. ठेवुन पाण्याने चेहरा स्वच्छ करणे.
* दिवसा गडद मेकअप त्वचेचा करवावा.
* लिपस्टीक ही गुलाबी रंगाची लावावी.
* पार्टीला जातांना केसांची हेअर स्टाईलला लेअर कटींग केसांची हेअर स्टाईल क्ररावी व अंबाड्याला छानशी हेअर स्टाईल करावी.
* साडीच्या रंगाची बिंदी लावावी व बिंदी ही मोठी लावावी.

*** हराभरा कबाब***

साहित्य:- १/४ किलो बटाटे, १/४ किलो ओला वाटाणा, १/४ किलो फ़रसबी, १जुडी पालक चिरुन, लिंबु अर्ध, १ टीस्पुन मीठ, २ टीस्पुन साख्रर, १मुठ कोथिबिर, १मुठ पुदिना, ७ ब्रेडचे स्लाईस, १ टेबल स्पुन कार्नपलावर, २ टेबल स्पुन मॆदा. ( वाटण मसाला- १ टीस्पुन धणे, १टीस्पुन जिरे ७-८ मिरी, २-३दालचिनी, ५-६ हिरवा मिरची, ७-८ लसुण, १ईच आले. ( सर्व एकत्र ) वाटण मसाला तयार करणे.)


कृति- बटाटे व वाटाणा उकडुन कुस्करावा, पालक ,पुदिना ,कोथिबिर चिरुन घालणे, वाटण मसाला तयार करणे त्यात मीठ, साख्रर, लिंबु . कोरडा चुरा ब्रेडचा पालक ,पुदिना ,कोथिबिर चिरुन घालणे, वाटण मसालात कार्नपलावर, मैदा व पाणी घालुन एकत्र करुन हाताने छोटो गॊळे करणे व तेलात तळणे.

प्राजक्ता पाटील.