Thursday, May 29, 2008

चिंकू शेक-

साहित्य- २आखेचिंकूचा फ़ोडी ,साखर २चमचे,दूध २कप.
कृति- प्रथम चिंकूचा फ़ोडी, साखर, दूध त्या मिक्सरमध्ये भांडयात एकदाच फ़िरवून घ्यावेत हा तयार झालेला आहे.तुमचा आवडता चिंकू शेक हा शेक फ़ार पातळ असतो कारण त्यात दूधाचे प्रमाण जास्त असते.फ़्रिजमध्येही शेक ठेवू शकतात.

Sunday, May 25, 2008

- बासुंदी-

साहित्य- १लिटर दूध, ५ते७ चारोळी, १ कप साखर, वेलचीपूड, काजू, बदामाची पूड.
कृति- प्रथम दूध आटवून घ्यावेत आणि त्यात साखर, वेलचीपूड, काजू, बदामाची पूड चारोळी घालून घ्यावेत थोडा खवा घालून घ्यावेत ही झाली आहे तयार बासुंदी.फ़्रिजरमध्येही बासुंदी ठेवली असता त्याचे आईस्क्रीम तयार होते.

Saturday, May 24, 2008

मिरचीचा ठेचा

मिरचीचा ठेचा
साहित्य- ५ हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या, कोंथिबीर, मीठ.
कृति- प्रथम हिरव्या मिरच्या गँसवर थोडया तेलात भाजून घ्यावेत, नंतर मिक्सरमध्ये मिरच्या टाकून घ्यावेत त्यात मीठ लसुण पाकळ्या, कोंथिबीर टाकून झाल्यानंतर एकदाच मिक्सरमध्ये मिरच्या फ़िरवून घ्यावेत. त्यात शेंगदाण्याचा कूट तिखटपणा कमी करण्यासाठी घालू शकतॊ. ठेचा तेलात परतवून घ्यावा.

Monday, May 19, 2008

मँगॊ शेक

साहित्य- आंब्याचा रस, १चमचा साखर, दूध, बर्फ़.(दूध थंडगारच असावे).
कृति- प्रथम आंब्याचा रसात साखर,दूध, बर्फ़ मिक्सरच्या भांडयात टाकून झाल्यावर एकदाच मिक्सर फ़िरवून घ्यावेत हा तयार झालेला आहे मँगॊ शेक. लहानान पासून तेमॊठयापर्यंत
सर्वाना खूप आवडतो. आंब्याचा रस जास्त उरले असता हा शेक होतो.
टीप- (आंब्याचा रस अगदी कमी उरलेला असल्यास त्यात १कप थंडगार दूध घालावे.)मँगॊ (शेक)
हा घट्ट असतो त्यामुळे त्यात दूधाचे प्रमाण कमी असावे.

Saturday, May 17, 2008

- फ़िंगर चिप्स

साहित्य- ५ते६ मोठे बटाटे(बटाटाची वरचे साले काढून घ्यावेत )व तळण्यासाठी तेल, मीठ.
कृति- प्रथम बटाटेची वरचे साले काढून घ्यावेत व फ़िंगर चिप्सचे काप करण्यासाठी यंत्र मिळते त्याचा
वापर करणे ते शक्य नसल्यास बटाटाचे ऊभे काप करुन घ्यावेत नंतर गँसवर गरम तेल करुन फ़िंगर चिप्सचे ऊभे काप गरम तेलात लालसर रंगावर तळून घ्यावेतनंतर मीठ लावून घ्यावेत. ही डिश लहान मुलांना फ़ार आवडते.टॊमँटॊ साँस बरोबर सर्व्ह करु शकतात.

Thursday, May 15, 2008

ओल्या खोब-याची हिरवी चटणी


साहित्य- ओल्या खोब-याचे तुकडे, २हिरवी मिरच्या, थोडे दही, साखर थोडी, अर्धा चमचा मीठ १लिंबु,कोथिंबीर बारीक चिरलेली बारीक चिरलेला पुदिना.
कृति- प्रथम मिक्सरमध्ये ओल्या खोब-याचे तुकडे त्यात हिरवी मिरच्या, थोडे दही, साखर थोडी , मीठ टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ,बारीक चिरलेला पुदिना हे सर्व टाकून झाल्यावर त्यात पाणी थोडे थोडे टाकून झाल्यावर चटणी मिक्सर मध्ये बारीक चटणी फ़िरवून घ्यावीत लिंबु पिळून झाला की ही खोब-याची हिरवी चटणी तयार झाली आहे. ही चटणी इडली सोबत खावू शकतात.

Wednesday, May 14, 2008

खमंग ढॊकळा

Dhokla

साहित्य- १००ग्रँम बेसन पीठ, २हिरवी मिरची, अर्धा इंच आले, लसुण पेस्ट, थोडी हळद, (लिंबूसत्व कण पाण्यात विरघळुन घेणे), थोडा खायचा सॊडा, व मीठ १चमचा, कोथिंबीर तसेच अर्धा चमचा साखर इत्यादी.

कृति- प्रथम एका पसरट भांडयामध्ये १००ग्रँम बेसन पीठ घेऊन त्यात आले,मिरची पेस्ट घालून हळद आणि लिंबूसत्व कण पाण्यात विरघळुन घ्यावेत व नंतर खायचा सॊडा व अर्धा चमचा साखर.घेऊन त्या बेसन पीठात मीठ ,हे सर्व वरील प्रमाणे टाकुन झाल्यानंतर ,थॊडे पाणी टाकल्यावर बेसन पीठ थोडे मिश्रण घट्ट करुन हाताने पीठ एकजीव झाल्यावर कुकरचा दॊन्ही भांडयात तेलाचा थोडा हात कुकरला लावणे व भांडयामध्ये हे मिश्रण घट्ट ओतुन घेऊन कुकरची शिटी काढून वाफ़ेवर साधारण १५मि.करुन घ्यावेत नंतर ढॊकळे झाल्यावर त्यावर जिरे,मोहरीची फ़ॊडणी ढॊकळ्यावर टाकून घ्यावेत थोडी कोथिंबीरची सजावट करुन सुरीने कापून घेऊन चिचेचा पाणी व बारीक शेव भुरभुरुन घ्यावीत.खमंग ढॊकळा तयार झालेला आहे.

Monday, May 12, 2008

खमंग कांदा भजी

साहित्य-१मोठा कांदा बारीक चिरलेला,३हिरवी मिरची, २वाट्या बेसन पीठ(पाण्यात थोडे घट्ट भिजवलेले बेसन पीठ घेणे.व तळ्यासाठी तेल गरम होवू देणॆ.) मीठ चवीपुरते, धणे जिरे पुड.
कृति- प्रथम एका कढईत गरम तेल तळ्ण्यासाठी होऊ द्या. आणि एका भांड्यात बेसन पीठ घेऊन त्याला पाण्यात थोडे घट्ट भिजवून घ्यावेत व बेसन पीठात कांदा,हिरवी मिरची,धणे जिरे पुड घालावे. नंतर गरम तेलात भिजवलेले बेसन पीठाचे मिश्रण हाताने थोडे थोडे गरम तेलात टाकावेत आणि लगेचच लालसर हॊण्या अगॊदर काढावेत आणि ही खमंग कांदा भजी तयार झाली आहे.ही डीश चहा बरॊबरही सर्व्ह करु शकतात..
(तळण काढतांना मंद आच ठेवावी.)

Friday, May 9, 2008

व्हेज मंचूरियन

साहित्य- १बाऊल मध्ये किसलेली ऊभी आकाराची पत्ता कोबी, गाजर बारीक किसलेले, २वाट्या मैदा,आल लसुण (पेस्ट), १ सिमला मिरची, १०बीन्स, (भाज्या पाण्यात वाफ़वणे) १वाटी कार्नप्लावर.
कृति- भाज्या पाण्यात वाफ़वून त्यात २वाट्या मैदा घेऊन १वाटी कार्नप्लावर घेणे. त्यानंतर वाफ़वलेला भाज्याचे पाणी नितरवावे,मैदामध्ये भाज्या सर्व टाकून आललसुण पेस्ट टाकून, गव्हाच्या कणके सारखे पीठ मळून घेऊन त्याचे छॊटे छॊटे गॊळे करुन गरम तेलात तळून घ्यावेत, नंतर लाल कलर येईपर्यंत तळून घ्यावेत व टॊमँटॊसाँस बरॊबर सर्व्ह करावे. हे झाले आहे व्हेज मंचूरियन, कुणी हे साँसचे सर्व मिश्रण करुनही व्हेज मंचूरियन खातात, नुसते कोरडेही मंचूरियन टॊमँटॊ साँस बरॊबर सर्व्ह
आपण करु शकतात. टीप- १वाटी कार्नप्लावर टाकल्याने व्हेज मंचूरियन फ़ुटत नाहीत.

Tuesday, May 6, 2008

सण आला एक माहेरवांशीण लेकीचा



"अक्षय्य तृतीया (आखाजी) सणाच्या तुम्हा सर्वांना शुभॆच्छा"....
वैशाख महिन्यात येणारा पाहिला सण हा आखाजी म्हणुन ओळखला जातो.हा दिवस साडेतीन पैकी एक मुहर्ताचा दिवस मानला जातो.खान्देशात या पारंपारिक सणाला फ़ारच महत्व आहे.आखाजी सणाच्या दिवशी सासुरवांशीण लेकी माहेरी येतात.. या दिवशी आंब्याच्या रस, पुरणपोळी असा सुदंर बेत असतो आणि खान्देशात या सणाला जास्त महत्त्व दिले जाते.
....





बहुगुणी तुळशीचे फ़ायदे...
१) अजीर्ण झाल्यावर तुळशीचा पानांच्या रसात सुंठ पावडर मिसळुन प्यालाने हा आजार बरा होतो.
२) भाजलेल्या जागी पानांच्या रस लावल्यास आग थांबते.
३) डोळे आल्यावर तुळशीचा पानांच्या रस १ थेंब डोळ्यात टाकल्यावर डोळ्याची पीडा दूर होते.
४) वेदना होत असलेल्या भागावर तुळशीचा पानांच्या रस लावावा.

Thursday, May 1, 2008

शेवयांची गोड खीर-(भारतीय खान्देशी पध्दतीने बनवलेली)




(Vermicelli , Indian culture from khandesh special food)
साहित्य- शेवया घरातल्या किंवा सुपरशाँपितुन (रेडीमेड) आणला तरी चालेल, म्हशीचे तुप, दुध, वेलची पावडर.साखर
कृति- मंद आचेवर शेवया तुपात घातल्या नंतर लगेचच चमच्याने शेवयांना परतत रहावे(शेवया लागु देऊ नये)लाल रंगावर होऊ दिल्यानंतर त्यात लागता लागता (म्हणजे पेज प्रमाणे) दुध व साखर घालावे आणि नंतर त्यात वेलची (पुड) स्वादानुसार घालावी.या खिरीच्या दुधाला आता ऊकळी आल्यानंतर गँस बंद करावा. हो,आता तुमची सर्वांची आवडती गरमा गरम शेवयांची गोड खीर तयार झालेली आहे.
टीप: यात आणखीन काजु,बदाम, केशर स्वादानुसार टाकु शकता.