Wednesday, May 14, 2008

खमंग ढॊकळा

Dhokla

साहित्य- १००ग्रँम बेसन पीठ, २हिरवी मिरची, अर्धा इंच आले, लसुण पेस्ट, थोडी हळद, (लिंबूसत्व कण पाण्यात विरघळुन घेणे), थोडा खायचा सॊडा, व मीठ १चमचा, कोथिंबीर तसेच अर्धा चमचा साखर इत्यादी.

कृति- प्रथम एका पसरट भांडयामध्ये १००ग्रँम बेसन पीठ घेऊन त्यात आले,मिरची पेस्ट घालून हळद आणि लिंबूसत्व कण पाण्यात विरघळुन घ्यावेत व नंतर खायचा सॊडा व अर्धा चमचा साखर.घेऊन त्या बेसन पीठात मीठ ,हे सर्व वरील प्रमाणे टाकुन झाल्यानंतर ,थॊडे पाणी टाकल्यावर बेसन पीठ थोडे मिश्रण घट्ट करुन हाताने पीठ एकजीव झाल्यावर कुकरचा दॊन्ही भांडयात तेलाचा थोडा हात कुकरला लावणे व भांडयामध्ये हे मिश्रण घट्ट ओतुन घेऊन कुकरची शिटी काढून वाफ़ेवर साधारण १५मि.करुन घ्यावेत नंतर ढॊकळे झाल्यावर त्यावर जिरे,मोहरीची फ़ॊडणी ढॊकळ्यावर टाकून घ्यावेत थोडी कोथिंबीरची सजावट करुन सुरीने कापून घेऊन चिचेचा पाणी व बारीक शेव भुरभुरुन घ्यावीत.खमंग ढॊकळा तयार झालेला आहे.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

This was the dish for breakfast today morning.

Don't you put rai ,khobare on top ?