अग्निहोत्र केव्हा करावे?
अग्निहोत्र हा होम सुर्यादयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी करावा.
अग्निहोत्र कृति-
१)एका ताम्र पिराँमिड पात्रात गाईच्या गोवरीला एक चपटा तुकडा खाली तळाला ठेवा.गोवरीच्या तुकडयांना तुप
लावून नीट पात्रात रचावेत म्हणजे हवा आत बाहेर खेळती राहील.
२)एक गोवरीच्या बोटाएवढया तुकडाला गाईचे तूप लावावे.तसेच तो तुकडा पॆटवून पात्रात रचलेल्या गाईच्या गोवरीच्या
आत मध्यभागी तूप लावलेला तुकडा पॆटवलेला ठेवावा पात्रातील गॊव-यांचे सर्व तुकडे पेट घेतील.
३)आपल्या डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन त्यास थोडेसे तूप तांदूळाला लावून दोन्ही वेळेला (अचूक टाईमवर)
हाताचे डिअर चिन्ह करुन छातीचा जवळ उजव्या हातावर थॊडे तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर तांदुळाची आहुति
होम पात्रात टाकावी.अशा वेळी अग्निहोत्र हॊम पूर्ण होईल.
* अग्निहोत्र मंत्र *
सुर्यादयाच्या वेळी (सकाळी)-
१) सूर्याय स्वाहा(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर तांदुळाची आहुति होम पात्रात टाकावी.खालील मंत्र म्हणावे.)
सूर्याय इदं न मम
२)प्रजापतये स्वाहा
(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर तांदुळाची आहुति होम पात्रात टाकावी.)
प्रजापतये इदं न मम
( वरीलप्रमाणे म्हटल्यावर मंत्र इदं न मम त्यावेळेस तांदुळाची आहुति होम पात्रात घालू नयेत .शेवटी उरलेले
तांदुळ होम पात्रात घालू नयेत .
अग्निहोत्रामुळे वातावरण शुध्द राहते.
सूर्यास्ताच्या वेळेचा मंत्र
अग्नये स्वाहा(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर आहुति होम पात्रात टाकावी)
अग्नये इदं न मम
प्रजापतये स्वाहा(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर आहुति होम पात्रात टाकावी)
प्रजापतये इदं न मम.
No comments:
Post a Comment