Wednesday, January 21, 2009

तीळ चटणी
साहित्य- तीळ १००ग्रँम, लसूण ६पाकळ्या, जिरे थोडे,लाल तिखट २लहान चमचे,मीठ थोडे चवीप्रमाणे ,

तयार कशी करावी पुढीलप्रमाणे-प्रथम तीळ निवडुन घ्यावी नंतर तीळ भाजून मिक्सरमध्ये लसूण ,जिरे,लाल तिखट ,मीठ चवीप्रमाणे घेऊन तीळ मिक्सरमध्ये एकदाच फ़िरवून घ्यावी. तीळीची चटणी पोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे.

कारळाची चटणी
साहित्य- कारळ १००ग्रँम. लसूण ६पाकळ्या , जिरे ,मीठ.

चटणी तयार कशी करावी पुढीलप्रमाणे -प्रथम कारळ भाजून घ्यावेत नंतर भाजलेले कारळ मिक्सरमध्ये लसूण ,जिरे,लाल तिखट ,मीठ एकदाच मिक्सरमध्ये फ़िरवून घ्यावी .ही तयार झाली आहे कारळाची चटणी.

Saturday, January 17, 2009

गाजर हलुवा


साहित्य- दूध एक लिटर,साखर २ कप,काजूचे तुकडे,बदाम तुकडे,वेलदोडे पुड,साजुक तूप,गाजराचा कीस २वाटी.
कृती- प्रथम कढईत साजुक तूप घेऊन त्यात गाजराचा कीस २वाटी घ्या.आणि चांगला गाजराचा कीस मऊ हॊऊ द्या.दूध एक लिटर दूध घेऊन त्यातले थोडे थोडे दूध गाजराचा कीसामध्ये घालावे .मिश्रण आटत आले की त्यात साखर टाकावी.त्यानंतर त्यात काजूचे तुकडे,बदाम तुकडे,वेलदोडे पुड घालावी मग हे मिश्रण चांगले कालवून घ्या नंतर कढई खाली उतरवून घ्या.गरम गाजर हलुवा तयार आहे.डीश मध्ये गरम गरम हलुवा खायला घ्या,.तो कसा झाला हे कळवा....