Wednesday, January 21, 2009

तीळ चटणी
साहित्य- तीळ १००ग्रँम, लसूण ६पाकळ्या, जिरे थोडे,लाल तिखट २लहान चमचे,मीठ थोडे चवीप्रमाणे ,

तयार कशी करावी पुढीलप्रमाणे-प्रथम तीळ निवडुन घ्यावी नंतर तीळ भाजून मिक्सरमध्ये लसूण ,जिरे,लाल तिखट ,मीठ चवीप्रमाणे घेऊन तीळ मिक्सरमध्ये एकदाच फ़िरवून घ्यावी. तीळीची चटणी पोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे.

कारळाची चटणी
साहित्य- कारळ १००ग्रँम. लसूण ६पाकळ्या , जिरे ,मीठ.

चटणी तयार कशी करावी पुढीलप्रमाणे -प्रथम कारळ भाजून घ्यावेत नंतर भाजलेले कारळ मिक्सरमध्ये लसूण ,जिरे,लाल तिखट ,मीठ एकदाच मिक्सरमध्ये फ़िरवून घ्यावी .ही तयार झाली आहे कारळाची चटणी.

No comments: