Sunday, February 1, 2009

मसालेभात


साहित्य- ३वाट्या तांदुळ,२चमचे तुप, ३चमचे गरम मसाला,तिखट ३चमचे,१वाटी गाजराचे तुकडे,१वाटी पत्त्ताकोबी,१वाटी सिमला मिरची चिरलेली, कांदा चिरलेला,कढीपत्ता,शेंगदाणे,वाटाणा १वाटी
कृति-प्रथम तांदुळ कुकरमध्ये तुपात मंद आचेवर भाजून घ्यावा नंतर भाजलेले तांदुळ काढुन घेणे. फ़ॊडणी द्यावी त्यानंतर कुकरमध्ये सर्व भाज्या गरम तुपात घालून मऊ होईपर्यत शिजवू देणे त्यात गरम मसाला,तिखट३चमचे,मीठचवीपुरते घालावेत नंतर गरम पाण्याला ऊकळी आली की त्यात भाजलेले तांदूळ घालून घ्यावेत.कुकरचे झाकण लावून ३शिट्या हॊवू देणे.हा तयार झाला आहे गरमा गरम मसालेभात

No comments: