आजपासून दिवाळी सणाला आरंभ झाला आहे.घरी बनवलेला चवदार फ़राळ व नवीन कपडे घालण्याचा आनंद न्याराच असतो तसेच बाजारातून आणलेले फ़टाके,आकाशगंगा उडवायचा एक निराळाच उत्साह असतो.
असा हा आगळा वेगळा सण दिवाळीचा आहे...माझ्यातर्फ़े आपणास दिवाळीच्या शुभेच्छा अगदी मनापासून शुभेच्छा........
हि दिवाळी आपणास सुख,समुध्दी ,भरभराटीची जावो हीच आशा....
- रव्याचा हलवा -
साहित्य- १ वाटी रवा,१वाटी साखर,तुप अर्धी वाटी,२वाटया पाणी ,बदाम,बेदाणा,वेलची पुड.
कृती- रवा तुपात भाजून घ्यावा.नंतर त्यात साख्रर,पाणी, व थॊडे मीठ,तूप घालून घाटावे.बदाम घालून
आळ्वावे.तुप
सुटून गोळा झाला की लावलेल्या ताटात रव्याचा घट्ट गोळा हाताने ताटात पसरवावा व नंतर तुकडे
करून घ्यावेत.हा झाला आहे रव्याचा हलवा... दिपावलीच्या शुभेच्छा
No comments:
Post a Comment