Friday, December 25, 2009



फ़्रूट केक
साहित्य-१कप साखर,१कप तुप,५अंडी,अडीच कप मैदा ,१टीस्पून बेकिंग पावडर,अर्धा चमचा मीठ,थोडे काजूचे तुकडे, थोडी चेरीज,बदाम तुकडे,ट्र्टीफ़्रुटी,फ़ळांचे तुकडे.
कृती- तुप व साखरेत अंडी फ़ेटून घ्यावे. त्यात मैदा,बेकिंग,मीठ,काजूचे तुकडे,चेरीज,बदाम,फ़ळांचे तुकडे,ट्र्टीफ़्रुटी केक पात्रात घालावे नंतर ओव्हन मध्ये १५०डिग्री टेंपरेचर ठेवावेत केक तयार झालाकी आयसिंग कोन ने केकला सजावट करा.

Sunday, October 18, 2009

टीप्स-
१)डाळ शिजवतांना त्यात थोडी हळद टाकल्यास डाळ लगेच शिजते.
२)चपात्या मऊ होण्यासाठी कणीक कोमट पाण्यात भिजवावी.
३)जिभेला फ़ोड झाल्यास गरम पाण्यात मध घालून त्याने गुळ्ण्या कराव्यात.
४)मेदूवडे करताना त्यात भिजवलेले थोडे साबुदाणे डाळ वाटताना त्यात घालावे वडे कुरकुरीत होतात.
५)भाजीचा ग्रेव्हीत थोडी साखर व मीठ घालावेत.
६)फ़ळे व भाज्या खाल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

Thursday, October 15, 2009

दिपावलीच्या शुभेच्छा....!

आजपासून दिवाळी सणाला आरंभ झाला आहे.घरी बनवलेला चवदार फ़राळ व नवीन कपडे घालण्याचा आनंद न्याराच असतो तसेच बाजारातून आणलेले फ़टाके,आकाशगंगा उडवायचा एक निराळाच उत्साह असतो.
असा हा आगळा वेगळा सण दिवाळीचा आहे...माझ्यातर्फ़े आपणास दिवाळीच्या शुभेच्छा अगदी मनापासून शुभेच्छा........
हि दिवाळी आपणास सुख,समुध्दी ,भरभराटीची जावो हीच आशा....
- रव्याचा हलवा -
साहित्य- १ वाटी रवा,१वाटी साखर,तुप अर्धी वाटी,२वाटया पाणी ,बदाम,बेदाणा,वेलची पुड.
कृती- रवा तुपात भाजून घ्यावा.नंतर त्यात साख्रर,पाणी, व थॊडे मीठ,तूप घालून घाटावे.बदाम घालून

आळ्वावे.तुप
सुटून गोळा झाला की लावलेल्या ताटात रव्याचा घट्ट गोळा हाताने ताटात पसरवावा व नंतर तुकडे

करून घ्यावेत.हा झाला आहे रव्याचा हलवा...
दिपावलीच्या शुभेच्छा

Wednesday, September 16, 2009

टीप्स

१) मैदा १चमचा, बेसन पीठ,१चमचा लिंबु रस,साय १चमचा हे सर्व एकत्र घट्ट करुन चेह्र-यावर स्क्रबप्रमाणे चोळा
त्वचा स्वच्छ होतो..
२) कडूनिंबचे पाने वाटून १तास केसांवर लावून केस स्वच्छ होतात व जंतुनाशक आहे.
३) चेह्ररा तेलकट असल्यास रात्री वि-लनझिंग मिल्क लावा व चेहरा धुवावा.
४) नींम फ़ेसवाँशने चेहरा धुवावा.

Sunday, July 19, 2009

कोको केक


वाढदिवसाचा दिवशी केकची मजा कापायची काही निराळीच असते त्यादिवशी नवीन कपडे घालायला मिळतात ,केकभवती विविध कल्ररचा मेणबत्तीने वाढदिवस साजरा करतात मी आज कोको केकची रेसीपी देत आहे.मी याच माहिनात माझी ही रेसीपी तयार करुन बघणार आहे आणि मी माझा वाढदिवस साजरा करणार आहे.

कोको केक
साहित्य:- एक पेला मैदा,तीन चतुर्थाश पिठीसाखर, २अंडी, अर्धा पेला बटर, पावपेला मिश्र ड्रायफ़्रुट,अर्धा पेला दूध,एक चमचा
लहान बेकिंग पावडर,एक मोठा चमचा कोको पावडर,पाव चमचा इन्सेस .
कृती:- लोणी व साखर हलके होईपर्यत फ़ेटा.मैदा+बेकिंग पावडर मिसळून चाळा. थोडासा मावा दूधात भिजवावा. अंडी फ़ॊडुन इन्सेस त्यात घालून फ़ेटा.व त्या लोणी +साखर+बटर फ़ेटलेलात हळूहळू फ़ेटलेले अंड मिसळा मग मैदा मिसळा आणि दूध मिसळून थोडे फ़ेटा .मग मोल्डमध्ये टाका.आणि उच्च तापमानावर १० मि. केक बेक करा.त्यावर मिश्र ड्रायफ़्रुट सजावट करा.
आणि खायला द्या. आपला प्रतिक्रिया जरुर कळवा..

Monday, February 16, 2009

दलिया

साहित्य-दलिया,रवा २कप,थोडी साखर,वेलची पूड,अर्ध्या नारळाचा खव,साजूक तूप थोडे दूध.

कृति-मंद आचेवर कढईत थोडे तूप घालून घेणे,नंतर त्यात दलिया,रवा भाजून घ्यावेत,मग कुकरमध्ये थॊडा पाण्यात दलिया टाका त्यात साखर,थोडे दूध घाला थोडी वेलची पूड नंतर नारळाचा खव आणि दलिया शिजवा व गँस बंद करुन घेणे,खाण्यासाठी दलिया तयार आहे.

Sunday, February 8, 2009

डाल तडका

साहित्य- २वाटी मुगाची डाळ,तुरीची डाळ,मठाची डाळ,चणा डाळ,फ़ॊडणीसाठी २आखे मिरची लाल
सुकलेला,जिरे,मोहरी,हिंग थोडा,तेल २चमचे,आले लसुण पेस्ट,तिखट २चमचे,मीठ.हळद १चमचा,कोथिंबीर,१ कांदा चिरलेला

कृति-प्रथम सर्व डाळी कुकरमध्ये ३शिट्यांवर झाला की त्यानंतर कढईत जिरे,मोहरी,हिंग थोडा,तेल २चमचे,आले लसुण पेस्ट घालून लाल मिरची घालून त्यानंतर डाळ कढईत घालून घेणे त्यात थोडे थोडे पाणी घालून घावेत
डाळीला ऊकळी आल्यावर गँस बंद करणे. डाळीत पाणी कमी घालावे कारण डाल तडका घट्ट भाजी दिसायला हवी.डाळीवर फ़ोडणी घालु नये कारण कढईतच फ़ोडणी झाल्यावर डाळ घालावी चाविष्ट लागते.