Sunday, April 27, 2008

एक सुंदर चहा




एक सुंदर चहा (फ़ुर्र SS के पियो )
सकाळचा चहा कसा तयार करतात याबद्दल विशेष चहाची कॄति मी देत आहे.मी केलेला चहा उत्तमच होतो अन त्या चहा बद्दल स्तुती ऎकायला मिळते. अशा त्या छान चहाची कॄति मी खाली देत आहे. हा चहा आपण एकदा अवश्य करुन पहा. आपला प्रतिसादही कळवा हं...!

साहित्य- (२ जणांसाठी) २ कप दूध ,ताजा डस्ट चहा पावडर,साखर एक चमचा
चहाची कॄति : प्रथम एका स्टिलच्या भांड्यात २ कप दूध घेऊन त्या मध्ये ऊकळी
आल्यावर त्यात दिड साखर चमचा प्रमाणानुसार व गोडी प्रमाणे टाकावा.त्यात ताजा डस्ट चहा पावडर दिड चमचा घालावी. या चहात पाणी मात्र अजिबात घालु नये.
यावेळी त्या ऊकळीला चमचा किंवा गाळणीने थोडे ढवळत जावे. गवती चहाची ताजी पत्ती सोबत त्यात आल छोट्या किसणीने किसुन घालावे (नोकरदार महिलांना हे न जमल्यास या मिश्रणा ऎवजी सूंठी पावडर घातली तरी चालेल)मग तयार व्हा या अन म्हणा फ़ुर्र SS के पियो !

2 comments:

Mess up in Thought said...

पण फ़क्त २ चं का?? आम्ही आलोतर ३ रा कप नाही करनार....हा हा..!!

prajakta patil said...

IN SEARCH OF DREAM
... 2 for नवरा and बायको...special tea...!
मग तिसरा कप empty हं!

हाSS हाss