Monday, February 16, 2009

दलिया

साहित्य-दलिया,रवा २कप,थोडी साखर,वेलची पूड,अर्ध्या नारळाचा खव,साजूक तूप थोडे दूध.

कृति-मंद आचेवर कढईत थोडे तूप घालून घेणे,नंतर त्यात दलिया,रवा भाजून घ्यावेत,मग कुकरमध्ये थॊडा पाण्यात दलिया टाका त्यात साखर,थोडे दूध घाला थोडी वेलची पूड नंतर नारळाचा खव आणि दलिया शिजवा व गँस बंद करुन घेणे,खाण्यासाठी दलिया तयार आहे.

Sunday, February 8, 2009

डाल तडका

साहित्य- २वाटी मुगाची डाळ,तुरीची डाळ,मठाची डाळ,चणा डाळ,फ़ॊडणीसाठी २आखे मिरची लाल
सुकलेला,जिरे,मोहरी,हिंग थोडा,तेल २चमचे,आले लसुण पेस्ट,तिखट २चमचे,मीठ.हळद १चमचा,कोथिंबीर,१ कांदा चिरलेला

कृति-प्रथम सर्व डाळी कुकरमध्ये ३शिट्यांवर झाला की त्यानंतर कढईत जिरे,मोहरी,हिंग थोडा,तेल २चमचे,आले लसुण पेस्ट घालून लाल मिरची घालून त्यानंतर डाळ कढईत घालून घेणे त्यात थोडे थोडे पाणी घालून घावेत
डाळीला ऊकळी आल्यावर गँस बंद करणे. डाळीत पाणी कमी घालावे कारण डाल तडका घट्ट भाजी दिसायला हवी.डाळीवर फ़ोडणी घालु नये कारण कढईतच फ़ोडणी झाल्यावर डाळ घालावी चाविष्ट लागते.

Sunday, February 1, 2009

मसालेभात


साहित्य- ३वाट्या तांदुळ,२चमचे तुप, ३चमचे गरम मसाला,तिखट ३चमचे,१वाटी गाजराचे तुकडे,१वाटी पत्त्ताकोबी,१वाटी सिमला मिरची चिरलेली, कांदा चिरलेला,कढीपत्ता,शेंगदाणे,वाटाणा १वाटी
कृति-प्रथम तांदुळ कुकरमध्ये तुपात मंद आचेवर भाजून घ्यावा नंतर भाजलेले तांदुळ काढुन घेणे. फ़ॊडणी द्यावी त्यानंतर कुकरमध्ये सर्व भाज्या गरम तुपात घालून मऊ होईपर्यत शिजवू देणे त्यात गरम मसाला,तिखट३चमचे,मीठचवीपुरते घालावेत नंतर गरम पाण्याला ऊकळी आली की त्यात भाजलेले तांदूळ घालून घ्यावेत.कुकरचे झाकण लावून ३शिट्या हॊवू देणे.हा तयार झाला आहे गरमा गरम मसालेभात