Sunday, February 1, 2009

मसालेभात


साहित्य- ३वाट्या तांदुळ,२चमचे तुप, ३चमचे गरम मसाला,तिखट ३चमचे,१वाटी गाजराचे तुकडे,१वाटी पत्त्ताकोबी,१वाटी सिमला मिरची चिरलेली, कांदा चिरलेला,कढीपत्ता,शेंगदाणे,वाटाणा १वाटी
कृति-प्रथम तांदुळ कुकरमध्ये तुपात मंद आचेवर भाजून घ्यावा नंतर भाजलेले तांदुळ काढुन घेणे. फ़ॊडणी द्यावी त्यानंतर कुकरमध्ये सर्व भाज्या गरम तुपात घालून मऊ होईपर्यत शिजवू देणे त्यात गरम मसाला,तिखट३चमचे,मीठचवीपुरते घालावेत नंतर गरम पाण्याला ऊकळी आली की त्यात भाजलेले तांदूळ घालून घ्यावेत.कुकरचे झाकण लावून ३शिट्या हॊवू देणे.हा तयार झाला आहे गरमा गरम मसालेभात

Wednesday, January 21, 2009

तीळ चटणी
साहित्य- तीळ १००ग्रँम, लसूण ६पाकळ्या, जिरे थोडे,लाल तिखट २लहान चमचे,मीठ थोडे चवीप्रमाणे ,

तयार कशी करावी पुढीलप्रमाणे-प्रथम तीळ निवडुन घ्यावी नंतर तीळ भाजून मिक्सरमध्ये लसूण ,जिरे,लाल तिखट ,मीठ चवीप्रमाणे घेऊन तीळ मिक्सरमध्ये एकदाच फ़िरवून घ्यावी. तीळीची चटणी पोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे.

कारळाची चटणी
साहित्य- कारळ १००ग्रँम. लसूण ६पाकळ्या , जिरे ,मीठ.

चटणी तयार कशी करावी पुढीलप्रमाणे -प्रथम कारळ भाजून घ्यावेत नंतर भाजलेले कारळ मिक्सरमध्ये लसूण ,जिरे,लाल तिखट ,मीठ एकदाच मिक्सरमध्ये फ़िरवून घ्यावी .ही तयार झाली आहे कारळाची चटणी.

Saturday, January 17, 2009

गाजर हलुवा


साहित्य- दूध एक लिटर,साखर २ कप,काजूचे तुकडे,बदाम तुकडे,वेलदोडे पुड,साजुक तूप,गाजराचा कीस २वाटी.
कृती- प्रथम कढईत साजुक तूप घेऊन त्यात गाजराचा कीस २वाटी घ्या.आणि चांगला गाजराचा कीस मऊ हॊऊ द्या.दूध एक लिटर दूध घेऊन त्यातले थोडे थोडे दूध गाजराचा कीसामध्ये घालावे .मिश्रण आटत आले की त्यात साखर टाकावी.त्यानंतर त्यात काजूचे तुकडे,बदाम तुकडे,वेलदोडे पुड घालावी मग हे मिश्रण चांगले कालवून घ्या नंतर कढई खाली उतरवून घ्या.गरम गाजर हलुवा तयार आहे.डीश मध्ये गरम गरम हलुवा खायला घ्या,.तो कसा झाला हे कळवा....

Thursday, December 25, 2008

मलई मेंथी मटार

मलई मेंथी मटार
सहित्य- मटार दाणे ४कप व २ कप निवडलेली मेंथीची पाने,१ कप मलई, गरम मसाला १लहान चमचे,तिखट,मीठ,तेल.
मसाला वाट्ण-कांदा एक, ओल्या खोब-याचा एक तुकडा,खसखस२चमचे, लसुण+आले पेस्ट२चमचेथोडे काजूचे तुकडे,
कृती-कांदा,खोबरे,खसखस,काजूचे तुकडे,लसुण,आले सर्व बारीक वाटून घ्या.मेंथी उकडून मिक्सर
मधून काढून मंद आचेवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात सर्व मसाला वाटण घालून परतवून घ्या.परतले की त्यात वाफ़वलेले मटार, मेंथी,तिखट,मीठ टाका.चांगले नीट परतवून घ्यावेत भाजीची
कढई खाली उतरवून त्यात मलई घालून सर्व्ह करणे...

Saturday, October 11, 2008

अग्निहोत्र केव्हा करावे?
अग्निहोत्र हा होम सुर्यादयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी करावा.

अग्निहोत्र कृति-
१)एका ताम्र पिराँमिड पात्रात गाईच्या गोवरीला एक चपटा तुकडा खाली तळाला ठेवा.गोवरीच्या तुकडयांना तुप
लावून नीट पात्रात रचावेत म्हणजे हवा आत बाहेर खेळती राहील.
२)एक गोवरीच्या बोटाएवढया तुकडाला गाईचे तूप लावावे.तसेच तो तुकडा पॆटवून पात्रात रचलेल्या गाईच्या गोवरीच्या
आत मध्यभागी तूप लावलेला तुकडा पॆटवलेला ठेवावा पात्रातील गॊव-यांचे सर्व तुकडे पेट घेतील.
३)आपल्या डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन त्यास थोडेसे तूप तांदूळाला लावून दोन्ही वेळेला (अचूक टाईमवर)
हाताचे डिअर चिन्ह करुन छातीचा जवळ उजव्या हातावर थॊडे तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर तांदुळाची आहुति
होम पात्रात टाकावी.अशा वेळी अग्निहोत्र हॊम पूर्ण होईल.

* अग्निहोत्र मंत्र *
सुर्यादयाच्या वेळी (सकाळी)-

१) सूर्याय स्वाहा(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर तांदुळाची आहुति होम पात्रात टाकावी.खालील मंत्र म्हणावे.)
सूर्याय इदं न मम
२)प्रजापतये स्वाहा
(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर तांदुळाची आहुति होम पात्रात टाकावी.)
प्रजापतये इदं न मम
( वरीलप्रमाणे म्हटल्यावर मंत्र इदं न मम त्यावेळेस तांदुळाची आहुति होम पात्रात घालू नयेत .शेवटी उरलेले
तांदुळ होम पात्रात घालू नयेत .

अग्निहोत्रामुळे वातावरण शुध्द राहते.
सूर्यास्ताच्या वेळेचा मंत्र
अग्नये स्वाहा(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर आहुति होम पात्रात टाकावी)
अग्नये इदं न मम
प्रजापतये स्वाहा(स्वाहाच्या वेळी डाव्या हातावर अखंड तांदूळ घेऊन स्वाहा म्हटल्यावर आहुति होम पात्रात टाकावी)
प्रजापतये इदं न मम.

Thursday, October 9, 2008

* तुम्हाला दसराच्या शुभेच्छा*विजयादशमी या दिवशी गोड पदार्थ बनवितात, आपटाची पाने लहान मुले मोठ्या व्यव-तीस देतात.तसेच उंच फ़ुट असा फ़टाके लावलेला रावण्याची प्रतिमा ऊभारण्यात येते त्याला रावण दहन म्हणतात.

Sunday, October 5, 2008



बदामांची स्वादिष्ट खीर-

साहित्य- १२ बदाम रात्री पाण्यात भिजत घालणे,साखर,दूध ,

कृती- बदाम रात्री पाण्यात भिजत घालुन, पाण्यातून बदाम काढुन मिव-सर मधून बदाम एकदाच फ़िरवून घ्यावेत, नंतर एका पँनमध्ये १चमचा तूप घालुन मिव-सर मधून बदाम फ़िरवलेले काढुन घेतलेले मिश्रण मंद गँसवर तुपात चांगले भाजून घ्यावेत त्यात चवीप्रमाणे साखर,दूध घालून चमच्याने नीट हलवून घावेत.बदामांची खीर मंद गँसवर
ठेवून झाल्यावर गँस बंद करुन घ्यावे. ही तयार झाली आहे बदामांची स्वादिष्ट खीर