Thursday, August 14, 2008

Our ilfe is fuil of colors ....
I hope this "15 th augst"! wiil add more colors to your life....
HAPPY INDESPENDENCE DAY....

Sunday, June 22, 2008

मेदूवडे-




सर्व पाककला कृति: प्राजक्ता






साहित्य- २वाटया उडदाची डाळ, मीठ, तेल,हिरवी, मिरची (अर्धी) ,आल कोथिंबीर,लसुण पेस्ट, बडीशॊप अर्धा चमचा,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा धणे .खाद्यतेल तळण्यासाठी व खायचा सॊडा १ चिमूट फ़क्त.



कृति-उडदाची डाळ साधारण ४ तास भिजत घालून घ्यावी, नंतर ती डाळ मिक्सरमध्ये फ़िरवून घ्यावी डाळ मिक्सरमध्ये फ़िरवतांना थोडे कमी पाणी त्यात घालावेत आणि कढईत तेल तापल्यावर एका जाड ओल्या कपडयावर लिंबाएढा गोळा हाताने चपटा करुन प्लँस्टिक कागदावर ठेवून गोल आकार द्यावा तसेच मध्यभागी एक भॊक पाडून ३-४ वडे लगेचच गरम तेलात तळून घ्यावेत. सांबारा वेगळा करुन त्या सोबत हे चटपटीत खमंग गरमा गरम वडे खायला द्यावेत. आपल्या खान्देशात हे मेदूवडे तर्पण विधीत( आगारी- पुर्वजां प्रति एक श्रध्दा म्हणून अग्नि पेटवून त्यात टाकलेला घास) नैवेद्य म्हणून ही केले जातात.दत्ताची किंवा नवनांथाच्या पोथीत ह्या वड्यांचा नैवेद्य म्हणून परामर्ष केलेला आहे.




Thursday, June 19, 2008

साबुदाणा वडा-

साहित्य-साबुदाणा अर्धा किलो, १चमचा लाल तिखट, ४ बटाटे ऊकडलेले, मीठ, शेंगदाण्याचा कूट.
कृति- प्रथम साबुदाणा रात्रभर भिजत घालून घ्यावा, त्यात बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यात लाल तिखट शेंगदाण्याचा कूट घालून एकत्र हाताने हे सर्व एकजीव करुन त्याचे वडे तयार करणे व साबुदाणा वडा तेलात तळून घ्यावेत. गरमा गरम वडे खाण्यासाठी तयार झालेले आहे.

Friday, June 13, 2008

पालक पनीर-

palak paneer


साहित्य- १जूडी पालक, आले, हिरवी मिरची व लसूण पेस्ट, १मोठा कांदा बारीक चिरलेला , १००गँम पनीरचे तुकडे, तेल, फ़ोडणीकरिता जिरे व मोहरी, मिरेपूड .
कृति- प्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्या,शिजवलेला पालक मिक्सरमध्ये फ़िरवून घ्यावा.एका पँनमध्ये कांदा घेउन तेलात जिरे व मोहरी ,लसूण पेस्ट टाकून झाल्यावर, मिक्सरमध्ये फ़िरवलेला पालक पँनमध्ये घालून घ्यावा आणि दुस-या कढईत पनीरचे तुकडे तेलात लाल रंगावर तळून घ्यावेत व पनीरचे तळलेले तूकडे पँन मध्ये टाकावे व पालकाच्या पातळ मिश्रणात घालून घ्यावेत. १५मि.पालक आणि पनीर शिजू द्यावेत.ही झाली आहे साधी सॊपी पालक पनीर भाजी.पालक पनीर ही भाजी रॊटी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत अधिक टेस्टी लागते.

Wednesday, June 11, 2008

डोसा


साहित्य

एक वाटी उडदाची डाळ, २ वाटया तांदुळ घ्या.(म्हणजे 1:2 प्रमाण होय).


कृति-

डाळ व तांदुळ रात्री भिजत घालून झाल्यावर सकाळी डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये फ़िरवुन घ्यावेत हे वाटतांना थॊडे थॊडे पाणी घालावेत. त्याचे ओले घट्ट पीठ व्हायला हवे असे वाटून घ्यावेत . नंतर पीठात मीठ व थॊडेतेल घालून घ्यावेत. पँन घेऊन झा-याच्या साहाय्याने पीठ पसरवून घ्यावेत. गॊलाकार पसरवून गँसवर डॊसा आलटुन पालटुन घेऊन तेल आजुबाजूला घालावे नंतर डोसा सोनेरी रंगाच्या झाल्यावर त्यात बटाटयांची भाजी टाकून मसाला डॊसाची गॊलाकार घडी करावी. सांबार किंवा चटणी सोबत सर्व्ह करणे.

Saturday, June 7, 2008

चटपटीत समोसे


कृति-पँटिस सारखे सारण तयार करुन घ्यावेत.प्रथम मैद्यात तेल आणि मीठ घालून पीठ भिजवून घ्यावेत हे झाल्यावर दोन पु-या लाटून घ्याव्यात त्यानां वरुन तेलाचा हात लावावा, तसेच त्या तेल लावलेल्या बाजू एकमेकांवर ठेवून त्याची पोळी लाटून ही पोळी तव्यावर शेकून घेतल्यावर लगेचच हाताने त्याचे दोन भाग करुन घ्यावेत. नंतर मध्ये कापून त्यात सारण भरुन त्रिकोणी घडी घालून झाल्यानंतर मैद्याच्या पेस्टने चिटकवुन झाल्यावर समोसे गरम तेलामध्ये तळून घ्यावेत.
चिंचेचे पाणी कसे तयार करावे - प्रथम पाण्यात चिंच आणि खजूर टाकावेत , त्या पाण्यात हे सर्व भिजत घालून झाल्यावर भरुन घ्यावेत आणि गॊड आंबट चिंचेचे पाणी समोस सोबत खायला तयार झाले आहे. चला तर मग करुन पाहूया!..चटपटीत समोसे...करा आता झटपट...मग ....!

Tuesday, June 3, 2008

पत्ता कोबीची कोशिंबीर-

साहित्य- किसलेली पत्ता कोबी, साखर १चमचा, दही वाटीभर, कोथिंबीर बारीक चिरलेली व मीठ
कृति- प्रथम किसलेली पत्ता कोबी घेऊन त्यात साखर, दही, कोथिंबीर,मीठ घालून घ्यावेत व चमच्याने चांगली हलवून घ्यावेत ही झाली आहे खाण्यासाठी झटपट कोशिंबीर.