चायनीज पाककला.....
( चायनीज पाककला..... )
१ ) *** चायनीज हक्का न्युड्ल्स.*** -
साहित्य- १०० ग्रम चायनीज हक्का न्युड्ल्सचे पाकिट, १ वाटी उभी चिरलॆलि पत्ता कोबी. १ वाटी सिमला १ वाटी उभी चिरलॆलि हिरवी मिरची १ वाटी कांदा उभा चिरलेला. १ वाटी टॊमाटो . आल लसुण पेस्ट व मिठ,सोयासास. चिलिग्रिन सास. टॊमाटोसास आवडी प्रमाणे टाकणे.कोथिंबिर
** कृ्ति.-प्रथम एका भांड्यात तेल १चमचा मोठा घेणे. वरिल सर्व भाज्या भांड्यात तेलात शिजवुन घ्याव्यात नंतर दूस-या पातेल्यात ऊकळ्लेल्या पाण्यात नुड्ल्स तुकडे न करता शेवयांप्रमाणे पाण्यातुन बाहेर काढावे व पुन्हा कढईत त्या नुड्ल्स घेउन शिजवुन घेतलेल्या भाज्यांमध्ये मिक्स करुन वरील कृतिप्रमाणे त्यात सोया सौस,टमाटो सौस आवडीप्रमाणे थोड्या प्रमाणात घालणे.नंतर तुमची ही चायनीज हक्का न्युड्ल्सची गरमा गरम डीश नाष्टासाठी तयार आहे.तर मग लागा तयार करायला.
***************************************************************
**** केसांची निगा -*****
१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.
२) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु पिळवा हे पाणी शाम्पुसारखे वापरावे.
३) कडुनिबांची पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस मजबुत तर होतातच शिवाय केस ही गळ्तही नाहीत.
४) जास्वंद जेलने केस गळ्त असल्यास मसाज व कोरफ़ड जेलने केसांना मसाज करावा .
५) शिकेकाई पाण्यात उकळुन हे पाणी शाम्पुसारखे वापरावे त्यामुळे केस चमकदार होतील.
६) मेहंदी पावडर एक पाकीट १०० ग्रॅम घेउन त्यात १चमचा चहापावडरचे पाणी उकळुन त्या मिश्रणात १ चमचा कॉफ़ी पावडरचे पाणी उकळुन त्यात १ चमचा काथा पावडर त्यात घालावी. ही मेहंदी केसांना २ तास ठेवावी. केस सोनेरी रंगाचे तर होतीलच. शिवाय मुलायम पण होतील .
*************************************************
*** चायनीज फ़ाईड राईस***-
साहित्य- अडीच वाटी बासमती तांदुळ, १ वाटी बीन्स( फ़रसबी) ,१ वाटी उभे तुकडे गाजरांचे, १ वाटी पत्त्ता कोबी, १ वाटी कोथबिर १ वाटी वाटाणे, १टीस्पुन सोयासोस व टोमाटॊ केचअप , तेल, मीठ.
कृ्ति- प्रथम तांदुळ पाण्यात शिजवावा( प्रेशर कुकर मधुन तांदुळ पाण्यात शिजवावा. प्रेशर कुकरचे झाकण न
लावुन).व सर्व भाज्याचे उभे तुकडे करावेत. कढईत सर्व भाज्याचे तेलात उभे तुकडे शिजवणे त्यात पाण्यात शिजवलेला भात कढईत घालणे त्यात १टीस्पुन सोयासोस व टोमाटॊ केचअप घालणे. गरमा गरम चायनीज फ़ाईड राईस डीश सर्व्ह करणे.
*******************************************************
*** गोल्डन स्कोअर***-
साहित्य- ब्रेडचे स्कोअर आकारात कापलेले १२ ब्रेडचे स्लाईस घेणे, कांदे २, गाजर २, १ वाटी बीन्स( फ़रसबी) १ वाटी सिमला मिरची, २बटाटे उकड्लेले ,सोयासोस व टोमाटॊ केचअप व आलं मिरची पेस्ट,४ ब्रेडचा स्लाईसचा चुरा, मैदा १/२.मीठ व १ वाटी कोथबिर, (२बटाटे उकड्लेले कुस्करणे).
कृ्ति- सर्व भाज्याचे बारीक तुकडे करावेत. तेल गरम झाल्यावर भाज्याचे बारीक तुकडे कढईत घालणे परवतणे. ब्रेडचे स्कोअर आकारात कापलेले १२ ब्रेडचे स्लाईसवर मैदा+ पाणी ते ब्रेडवर पेस्ट करुन. व .सोयासोस व टोमाटॊ केचअपभाज्या शिजवुन भाज्या सर्व ब्रेडवर स्कोअरध्ये स्लाईसवर भाज्या सर्व ब्रेडवर भ्ररणे. मैदा+ पाणी ते ब्रेडवर पेस्ट करुन स्कोअरध्ये स्लाईसवर पेस्ट पसरवावे, स्लाईसची बाजु बंद करणे .ब्रेडवरचे स्लाईस मैदा+ पाणी घट्ट यांचे मिश्रण करणे.सर्व ब्रेडवरचे स्कोअरध्ये स्लाईस गरम तेलात तळणे( फ़िश सारखे फ़्राय करणे).टोमाटॊ केचअप बरोबर गोल्डन स्कोअर डीश गरमा गरम सर्व्ह करणे. लहान मुलांनागोल्डन स्कोअर डीश गरमा गरम खायला आवडेल व जास्तीचा ब्रेड वाया जात असल्यास गोल्डन स्कोअर डीश आपण ही चायनीज पाककला बनवावीत. टीप-( चायनीज पाककलेत अजिनोमोटो या मीठामुळे ह्रुदय रोग उदभवतो २ चुट्की घालणे)
***सौंदर्य प्रसाधने च त्वचेची निगा***
* चेहरा नेहमी क्लिन्झिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करणे,किंवा कच्चा दुधात लिंबु पिळुन चेहरा स्वच्छ करणे.
*त्वचेला मुलतानी माती पावडर, चंदन पावडर या पावडरचा फ़ेसपॅक त्वचेला १५मि. ठेवुन पाण्याने चेहरा स्वच्छ करणे.
* दिवसा गडद मेकअप त्वचेचा करवावा.
* लिपस्टीक ही गुलाबी रंगाची लावावी.
* पार्टीला जातांना केसांची हेअर स्टाईलला लेअर कटींग केसांची हेअर स्टाईल क्ररावी व अंबाड्याला छानशी हेअर स्टाईल करावी.
* साडीच्या रंगाची बिंदी लावावी व बिंदी ही मोठी लावावी.
*** हराभरा कबाब***
साहित्य:- १/४ किलो बटाटे, १/४ किलो ओला वाटाणा, १/४ किलो फ़रसबी, १जुडी पालक चिरुन, लिंबु अर्ध, १ टीस्पुन मीठ, २ टीस्पुन साख्रर, १मुठ कोथिबिर, १मुठ पुदिना, ७ ब्रेडचे स्लाईस, १ टेबल स्पुन कार्नपलावर, २ टेबल स्पुन मॆदा. ( वाटण मसाला- १ टीस्पुन धणे, १टीस्पुन जिरे ७-८ मिरी, २-३दालचिनी, ५-६ हिरवा मिरची, ७-८ लसुण, १ईच आले. ( सर्व एकत्र ) वाटण मसाला तयार करणे.)
कृति- बटाटे व वाटाणा उकडुन कुस्करावा, पालक ,पुदिना ,कोथिबिर चिरुन घालणे, वाटण मसाला तयार करणे त्यात मीठ, साख्रर, लिंबु . कोरडा चुरा ब्रेडचा पालक ,पुदिना ,कोथिबिर चिरुन घालणे, वाटण मसालात कार्नपलावर, मैदा व पाणी घालुन एकत्र करुन हाताने छोटो गॊळे करणे व तेलात तळणे.
प्राजक्ता पाटील.
2 comments:
प्राजक्ता
मेन्यु पदार्थांची साईट लाजबाब आहे.
नवीन काहीतरी शिकायला मिळाले.
शुभेच्छा
अपर्णा.
Tasty blog and nice too
Post a Comment