Saturday, November 17, 2007

स्पींग रोल , घरगुती टिप्स आणि कविता.

दिवाळी - कविता
हासत आनंदी दिवाळी
ही माझ्या दारी आली
करु तिचे स्वागत.
पुजा करोनी
मंगलमय वातावरण बहरले.
प्राजक्ताचा सडा पडुनी
गुलाबी थंडीत न्हाऊ दे
लावुनी दिप- पणती
ऊजळु दे ज्योती लक्ष-लक्ष
हीच खरी समुध्दी
अन धन मिळु दे आम्हा
दिप प्रकाशाचे ऊजळु दे दारी .
-----------

** स्पींग रोल**
साहित्य:- ५/६ बीन्स, १गाजर, १कप कोबी, १वाटी नुड्ल्स उकडलेला, २ कांदे, १टी स्पुन सर्व साँस घालणे १/४ कडधान्य
मोड आलेले, तेल, मीठ.
कृति- एका कढईत २ टे. स्पुन तेल गरम झाल्यावर सर्व भाज्याचे लांब तुकडे करुन गरम तेलात टाका, मोड आलेले

कडधान्य पण घाला २/३ मि. भाज्याचे तुकडे तेलात परतवा त्यात नुड्ल्स उकडलेला, मीठ चवीप्रमाणे(गँस बंद करणे.)
मैदा+ पाणी व तेल, मीठ सर्व एकत्र करुन घट्ट गोळा करुन १/२ तास झाकुन ठेवा त्याचे लहान घट्ट गोळे करुन
पुरी एवढे लाटुन भाज्याचे तुकडे सर्व एकत्र करुन पुरणाचा सारणा सारखे भ्ररावेत व मैदाच्या पेस्ट पुरीला लावुन
मैदाच्या लाट्लेल्या पुरीचा रोल करुन तेल गरम झाल्यावर दुस-या कढईत तयार झालेले स्पींग रोल तळणे.


*** घरगुती टिप्स ***

* वांगे भाजण्यापुर्वी तेलाचा हात लावावा.
* वरण उरले असल्यास त्यात सर्व पिठे मिसळुन दशमीचे पिठ तयार होते.
* भाज्या शिजवतांना त्यामध्ये चिमुटभर खायचा सोडा टाकल्यास भाज्याचा रंग टिकतो.
*भाज्या फ़ार बारीक चिरु नयेत त्यामुळे त्यातील जीवनस्त्वे नष्ट होतात.
* गव्हाचा पिठात सोयाबीनचे पिठ मिसळावे.

1 comment:

Asha Joglekar said...

करून बघितले पाहिजे तुझे स्प्रिंग रोल्स । टिप्स पण खूप उपयोगी आहेत.