साहित्य-१मोठा कांदा बारीक चिरलेला,३हिरवी मिरची, २वाट्या बेसन पीठ(पाण्यात थोडे घट्ट भिजवलेले बेसन पीठ घेणे.व तळ्यासाठी तेल गरम होवू देणॆ.) मीठ चवीपुरते, धणे जिरे पुड.
कृति- प्रथम एका कढईत गरम तेल तळ्ण्यासाठी होऊ द्या. आणि एका भांड्यात बेसन पीठ घेऊन त्याला पाण्यात थोडे घट्ट भिजवून घ्यावेत व बेसन पीठात कांदा,हिरवी मिरची,धणे जिरे पुड घालावे. नंतर गरम तेलात भिजवलेले बेसन पीठाचे मिश्रण हाताने थोडे थोडे गरम तेलात टाकावेत आणि लगेचच लालसर हॊण्या अगॊदर काढावेत आणि ही खमंग कांदा भजी तयार झाली आहे.ही डीश चहा बरॊबरही सर्व्ह करु शकतात..
(तळण काढतांना मंद आच ठेवावी.)
1 comment:
खमंग कांदा भजीसारखेच एकदा खमंग ढोकळे सुध्दा कसे करावे ते सांगा.
Post a Comment