सर्व पाककला कृति: प्राजक्ता
साहित्य- २वाटया उडदाची डाळ, मीठ, तेल,हिरवी, मिरची (अर्धी) ,आल कोथिंबीर,लसुण पेस्ट, बडीशॊप अर्धा चमचा,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा धणे .खाद्यतेल तळण्यासाठी व खायचा सॊडा १ चिमूट फ़क्त.
कृति-उडदाची डाळ साधारण ४ तास भिजत घालून घ्यावी, नंतर ती डाळ मिक्सरमध्ये फ़िरवून घ्यावी डाळ मिक्सरमध्ये फ़िरवतांना थोडे कमी पाणी त्यात घालावेत आणि कढईत तेल तापल्यावर एका जाड ओल्या कपडयावर लिंबाएढा गोळा हाताने चपटा करुन प्लँस्टिक कागदावर ठेवून गोल आकार द्यावा तसेच मध्यभागी एक भॊक पाडून ३-४ वडे लगेचच गरम तेलात तळून घ्यावेत. सांबारा वेगळा करुन त्या सोबत हे चटपटीत खमंग गरमा गरम वडे खायला द्यावेत. आपल्या खान्देशात हे मेदूवडे तर्पण विधीत( आगारी- पुर्वजां प्रति एक श्रध्दा म्हणून अग्नि पेटवून त्यात टाकलेला घास) नैवेद्य म्हणून ही केले जातात.दत्ताची किंवा नवनांथाच्या पोथीत ह्या वड्यांचा नैवेद्य म्हणून परामर्ष केलेला आहे.
No comments:
Post a Comment