साहित्य- १किलो ताजा खवा
१किलो साखर
२००ग्रँम मैदा
१मूठभर रवा
१चिमूटभर बेकिंग पावडर
१ कप कोमट दुध
कृती- प्रथम वरील प्रमाणात मैदा,खवा, १ चिमूटभर बेकिंग पावडर,१मूठभर रवा,हे सर्व कोमट दुधात एकत्र करुन मिश्रण एकजीव करावेत त्यानंतर भिजवून १५मि.बाजुला ठेवावेत.नंतर याचे छोटे गोळे करुन (गावराणी/डालडा आपल्या सोयीनुसार उपलब्ध) तुपात तळून घ्या.तळुन झाल्यानंतर साखरेच्या पाकात हे गुलाबजामचे गोळॆ थंड झाल्यावर टाका .आता पहा चविष्ट ,लज्जतदार,गोड पदार्थाची डिश तयार आहे.
मी गुलाबजामच्या निरनिराळ्या रेसिपि सादर केल्याच आहे. त्यात हा माझा गोड पदार्थ सणासुदीला निश्चित करुन बघा आणि आभिप्राय जरुर कळवा.
No comments:
Post a Comment