Monday, April 14, 2008

टिप्स* आणि लिंबाच गोड लोणचं

* टिप्स*

१) भेंडीसारखा चिकट भाज्यामध्ये १चमचा पीठ टाकुन परतल्यास त्याचा चिकटपणा कमी होतो.
२) नेलपाँलिशची बाटलीचे झाकण पँक बसल्यास झाकणाला व्हँसलीन लावावे.
३) डायफ़ुट टाईट एअर भांडयात बंद करुन ठेवा डायफ़ुट जास्त काळ टिकतील.
४) शेंगदाणाची चिक्की झाल्यानंतर त्या ताटाला तुपाचा हात लावुन मगच शेंगदाणाची चिक्की
ताटात काढुन घ्यावीत . शेंगदाणाची चिक्की ताटाला चिकटते नाही.
*************************************************************************************
- लिंबाच गोड लोणचं- साहित्य- २५ लिंबु,एक सपाट वाटी लाल तिखट, अंदाजे मीठ, १चमचा मेंथी, १किलो साखर

२चमचे हळद, २चमचे हिंग, व तेल.
कॄति:- लिंबु धुवून व कोरडे पुसून त्यांच्या फ़ोडींना मीठ व हळद, साखर, तिखट लावुन आणि
मेंथी तेलात तळुन घेतल्यावर एका काचेचा बरणीत लिंबुच्या फ़ोडीना मीठ व हळद,

साखर, तिखट लावुन झाल्यावर काचेचा बरणीत लोणचं भरणे व उन्हात बरणी ठेवुन
६ दिवस मुरत ठेवणे.हे लिंबाच गोड लोणचं लहान मुलांना फ़ार आवडते.

No comments: