Tuesday, April 29, 2008

नारळाचा सार (सोल कढी)

साहित्य- १कप नारळाचे दुध, २वाट्य़ा आंबट ताक ,३-४ हिरवा मिरच्या, कढीपत्ता, १चमचा साखर, १चमचा मीठ, कोथिंबीर.
कॄति- कढईत तूप गरम झाल्यावर जिरे, मिरच्या, कढीपत्ता, घालून फ़ोडणी करुन त्यानंतर नारळाचे दुध घालावे. १उकळी आल्यावर ढवळावे, साखर,मीठ, कोथिंबीर घालणे.
मग पहा बनवुन अन झटपट सर्व्ह करा तर!

2 comments:

Waman Parulekar said...

आपला ब्लॉग आवडला. आपण दिलेली मालवणी सोलकडीची पध्दत कणकवली,राजापूर कडील आहे. आमच्या वेंगुर्ला कुडाळ मालवण भागात सोलकडी करताना फोडणी देत नाहीत. धन्यवाद

prajakta patil said...

श्री.वामन परुलेकरजी
आपण माझ्या चायनीज पाककला आणि ब्युटी टीप्स...!या साईट वर आलात या बद्द्ल धन्यवाद.सोलकढी ही डीश कुणी फ़ोडणी न देता बनवत असु शकेल पण मी गोव्याला नारळाचा रस्सा (सोलकढी)ही फ़ोडणी व कोथंबीर युक्त खाल्ली आहे आणि विना फ़ोडणी सुध्दा खाल्ली आहे.तेव्हा पध्द्त वेगळी असेल पण प्रकार एकच आहे.

प्राजक्ता.